ते येतात आणि मृतदेह टाकून जातात, रेल्वे स्टेशन की गुन्हेगारीचा अड्डा, सीसीटीव्ही पाहून तुमच्या अंगावर काटा येईल

बंगळुरुतील ब्यपनहल्ली रेल्वेस्थानकाबाहेर एक संशयित ड्रम आढळून आला. रेल्वे पोलिसांनी ड्रम उघडून पाहिले असता आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला.

ते येतात आणि मृतदेह टाकून जातात, रेल्वे स्टेशन की गुन्हेगारीचा अड्डा, सीसीटीव्ही पाहून तुमच्या अंगावर काटा येईल
अनैतिक संबंधातून मुलाने केली आईच्या प्रियकराची हत्या
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 12:02 PM

बंगळुरु : रेल्वेस्थानकाबाहेर ड्रममध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने बंगळुरु शहरात एकच खळबळ माजली आहे. गेल्या तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. बंगळुरुतील ब्यपनहल्ली रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. मृतदेह ठेवताना आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच महिलेची हत्या नेमकी कशी झाली हे स्पष्ट होईल. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

तिघे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सदर महिला 31 ते 35 वर्षे वयातील असून, अद्याप तिची ओळख पटलेली नाही. तीन संशयित तरुण रिक्षातून ब्यपनहल्ली रेल्वेस्थानकात आले. त्यांनी रिक्षातून महिलेचा मृतदेह असलेला ड्रम काढला आणि रेल्वेस्थानकाबाहेर ठेवून पळ काढला. संशयित रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा आणि संबंधित रिक्षाचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडल्यानंतरच नेमकी घटना उघड होईल.

शहरात खळबळ

तीन महिन्यात ही दुसरी घटना आहे. याआधीही यशवंतपूर रेल्वे स्थानकाबाहेर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मछलीपट्टनम येथून यशवंतपूर स्थानकात अशाच प्रकारे मृतदेह आणण्यात आला होता. त्या घटनेचाही तपास अद्याप सुरु आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता दुसरा मृतदेह रेल्वे स्थानकात आढळला आहे. या घटनांमुळे शहरात खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.