Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बूक केली कार, पण झालं असं की गमावले 24 लाख रुपये

सध्या ऑनलाईनचं युग असून प्रत्येक काम चुटकीसरशी पूर्ण होतं. पण ऑनलाईन व्यवहारात कधी कधी मोठा फटका बसतो. असाच काहीसा फटका एक विवाहित जोडप्याला बसला आहे.

लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बूक केली कार, पण झालं असं की गमावले 24 लाख रुपये
एका कार राईडसाठी जोडप्याला मोजावी लागली 24 लाखांची रक्कम, असं काय झालं की बसला इतका मोठा फटका
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 3:09 PM

मुंबई : शहरांमध्ये वाहतुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अॅपवरून गाडी सहज बूक करता येते. काही मिनिटातच गाडी दारात उभी दिसते आणि इच्छित ठिकाणी पोहोचवते. मग पैसे रोख किंवा ऑनलाईन पद्धतीने देता येतात. तर कधी बिल ऑटो मोडमध्ये पे करण्याची सुविधा असते. पण अशीच एक राईड अमेरिकेतील विवाहित जोडप्याला चांगलीच महागात पडली. एका उबेर राईडसाठी जोडप्याला थोडी थोडकी नाही तर तब्बल 24 लाख रुपयांची किंमत मोजावी लागले. एक चूक जोडप्याला चांगली महागात पडली आणि डोक्यावर हात मारण्याची पाळी आली. उबेरच्या एका चुकीचा फटका जोडप्याला चांगलाच बसला.

नेमकं काय झालं?

डगलस ऑर्डोनेज आणि डोमिनिक असं विवाहीत जोडप्याचं नाव आहे. दोघे लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुआतेमाला येथे गेलं होतं. यासाठी पत्नी डोमिनिकने उबेर बूक केली. इच्छित ठिकाणी पोहोचल्यानंतर ऑटो मोडमधून पैसे भरले गेले. इच्छित स्थळी पोहोचल्याने नवरा बायको आनंदातच होते. मग तिथे पोहोचल्या पोहोचल्या एका कॉफी शॉपमध्ये दोघं गेले. कॉफीचा आनंद लुटला आणि पैसे भरण्यासाठी गेले तेव्हा डगलसच्या पायाखालची जमिनच सरकली.

खात्यात कमी पैसे असल्याचा मेसेज त्याला आला. इतकंच काय तर वारंवार पेमेंट करताना असाच मेसेज येत होतो. त्यामुळे बँक खातं तपासलं तर उबेर राईडसाठी 29 हजार डॉलर कापल्याचं दिसून आलं. नेमकं काय झालं आहे यासाठी मग धडपड सुरु झाली. उबेर ड्रायव्हरने दिलेलं बिल तपासलं तेव्हा खरा प्रकार समोर आला.

खात्यातून इतके पैसे कसे गेले

उबेरला कार राईडचे पैसे कोस्टा रिकन कोलन करंसीत घ्यायचे होते. पण चुकीने युएस डॉलरमध्ये रक्कम घेतली गेली. त्यामुळे त्याच्या खात्यात पैसे उणे 22697 डॉलर्स असे दाखवत होते. खरं तर ही रक्कम 4500 रुपये इतकी होती. पण बिल 600 पटीने वसूल केलं गेलं होतं. मात्र डॉलरचा हिशेब पकडला असता ती रक्कम 29,994 डॉलर इतकं झालं आहे.

उबेरकडून रक्कम परत मिळाली पण…

उबेरच्या चूक लक्षात आल्यानंतर रक्कमेची परतफेड करण्यात आली. लग्नाचा वाढदिवस पूर्णपणे पैशांचा गुंता सोडवण्यात गेला. घरी परत येईपर्यंत उबेरकडून पैसे परत मिळाले नव्हते त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. अखेर एक आठवड्याच्या धडपडीनंतर गेलेली रक्कम परत मिळाली आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.

'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.