मुलाने खेळता खेळता कॅरम तोडला, संतापलेल्या महिलेने मुलासोबत जे केले ते भयंकरच

पायल काही कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी तिने मुलाला आपली मैत्रीण ज्योतीकडे ठेवले होते. मुलाकडून खेळता खेळता ज्योतीचा कॅरम तोडला. यामुळे ज्योती संतापली आणि तिने मुलाला बेदम मारहाण केली.

मुलाने खेळता खेळता कॅरम तोडला, संतापलेल्या महिलेने मुलासोबत जे केले ते भयंकरच
कॅरम तोडला म्हणून मुलाला बेदम मारहाणImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 10:12 PM

गाझियाबाद : मुलाने कॅरम तोडला म्हणून संतापलेल्या महिलेने मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना गाझियाबादमध्ये घडली. महिलेच्या मारहाणीत मुलाचे लिव्हर फाटल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या पित्याने त्याच्या आईसह तिच्या मैत्रिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. ज्योती असे मारहाण करणाऱ्या आरोपी महिलेचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी चिमुकल्याच्या मोठ्या बहिणीचे कँसरने निधन झाले होते. मुलाचे आई-वडिल वेगवेगळे राहत असून, त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया कोर्टात सुरु आहे.

दोन वर्षापूर्वी मुलीचा कँसरने मृत्यू

मुलाचा पिता अरुण मोबाईल रिपेरिंगचे काम करतो. अरुण आणि पायल यांचा 2010 मध्ये विवाह झाला होता. मात्र वैवाहिक वादातून 2020 मध्ये दोघे वेगळे झाले. त्यांचा चार वर्षाचा मुलगा देखील पायलसोबत राहत होता. दोन वर्षापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलीचा कँसरने मृत्यू झाला.

कॅरम तोडला म्हणून मुलाला बेदम मारहाण

पायल काही कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी तिने मुलाला आपली मैत्रीण ज्योतीकडे ठेवले होते. मुलाकडून खेळता खेळता ज्योतीचा कॅरम तोडला. यामुळे ज्योती संतापली आणि तिने मुलाला बेदम मारहाण केली.

हे सुद्धा वाचा

उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू

पायल जेव्हा परत आली तेव्हा मुलाने तिला पोट दुखत असल्याचे सांगितले. पायल त्याला लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात घेऊन गेली. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.

मुलाचे शवविच्छेदन केले असता मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या जखमी दिसल्या. तसेच पोटावर लाथ मारल्याने मुलाचे लिव्हर फाटले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले.

आरोपी महिलेला अटक

याप्रकरणी ज्योती विरोधात साहिदाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ज्योतीला अटक केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.