डेटिंग अॅपवर ओळख, सहा महिने लिव्ह इन रिलेशनशीप; मग संशयास्पद मृत्यू, मॉडेलसोबत नेमके काय घडले?

चार दिवसांपूर्वी दुबईहून आली होती. प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहायची. दोघे जण बाल्कनीत दारु पित बसले होते. मात्र त्यानंतर एअर हॉस्टेसचा मृतदेहच समोर दिसला.

डेटिंग अॅपवर ओळख, सहा महिने लिव्ह इन रिलेशनशीप; मग संशयास्पद मृत्यू, मॉडेलसोबत नेमके काय घडले?
मनाविरोधात लग्न केल्याने मुलीच्या बापाने जावयाला संपवले
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 9:19 PM

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एका एअर होस्टेसचा चार मजली इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या चार दिवसांपूर्वीच ती दुबईहून परतली होती. येथे ती शहरातील कोरमंगला सोसायटीत प्रियकरासोबत राहत होती. बेंगळुरू पोलिसांनी त्याला हिमाचल प्रदेश येथून अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आदेश असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. अर्चना धीमान असे या 28 वर्षीय एअर होस्टेसचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी ती दुबईहून बंगळुरूला परतली होती.

अर्चनाच्या आईचा प्रियकरावर हत्येचा आरोप

अर्चना आणि आदेश नावाच्या प्रियकरसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. अर्चना आणि आदेश दोघेही टेक प्रोफेशनल असून, येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. अर्चनाच्या मृत्यूप्रकरणी तिच्या आईने आदेशवर आरोप केला आहे. आदेशनेच तिला बाल्कनीतून ढकलले, असे अर्चनाच्या आईने म्हटले आहे.

एका अॅपवर दोघांची ओळख झाली

अर्चना आणि आदेशची भेट एका डेटिंग अॅपवर झाली होती. गेल्या 6 महिन्यांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांमध्ये वारंवार भांडण होत असल्याचे आदेशने पोलीस चौकशीत सांगितले. घटनेच्या रात्री दोघेही बाल्कनीत मद्यपान करत होते. आदेशने पोलिसांना सांगितले की, अर्चना बाल्कनीतून अचानक पडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांचे पथक रुग्णालयात पोहोचले आणि प्राथमिक कारवाई करत आदेशला ताब्यात घेतले. आदेशला हत्येप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अर्चनाच्या पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर पुढील तपास केला जाईल.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.