यूट्युबवर शिक्षा किती आहे ते पाहिले, मग विवाहित प्रेमिकेसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य !
लग्नानंतर माहेरी आलेली गुड्डी 22 जानेवारी रोजी सासरी जाण्यासाठी निघाली. मात्र ती सासरी पोहचलीच नाही. ती घरी न पोहचल्याने नातेवाईकांनी श्री बालाजी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली.
नागौर : राजस्थानमध्ये एक भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येच्या चार दिवसानंतर हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले. गुड्डी असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे, तर अनोपाराम असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अनोपाराम विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अनोपारामला अटक केली आहे. आरोपीने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र अद्याप पोलिसांना मृतदेह मिळाला नाही.
सासरी जाण्यासाठी निघाली मात्र तिथे पोहचलीच नाही
गुड्डी हिचे अनोपारामसोबत प्रेमसंबंध होते. मात्र घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्याशी करुन दिले. लग्नानंतर माहेरी आलेली गुड्डी 22 जानेवारी रोजी सासरी जाण्यासाठी निघाली. मात्र ती सासरी पोहचलीच नाही. ती घरी न पोहचल्याने नातेवाईकांनी श्री बालाजी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली.
गावकऱ्याने प्रियकरासोबत जाताना पाहिले होते
गावातील एका व्यक्तीने गुड्डीला अनोपारामला गाडीवरुन नागौरच्या दिशेने जाताना पाहिले होते. यानंतर दुपारी 3 नंतर तिचा मोबाईल बंद येत होता. यानंतर 2 फेब्रुवारी रोजी बालवा रोडवरील केंद्रीय विद्यालयाच्या पाठीमागे नागौर पोलिसांना मानवी जबडा, ओढणी, केस आणि रक्ताने माखलेले कपडे मिळाले.
कपड्यांची ओळख पटल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले
पोलिसांनी बालाजी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंदवणाऱ्या नातेवाईकांना बोलावले आणि कपड्यांची ओळख पटवली. यावेळी नातेवाईकांनी कपडे गुड्डीचेच असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी अनोपारामला ताब्यात घेतले.
आरोपीकडून हत्येची कबुली
आरोपीची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. आरोपीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी डेहरु गावातील विहिरीत तीन दिवस सर्च ऑपरेशन केले. मात्र अद्याप गुड्डीचा मृतदेह सापडला नाही. आरोपीने क्राईम सिरियल पाहिली. मग यूट्युबवर हत्या प्रकरणात काय शिक्षा होते ते पाहिले आणि हे हत्याकांड घडवले.