गर्लफ्रेंडला बोलावलं, विष पाजलं… अन् मरणाच्या दारात ढकलून पळून गेला तो !

| Updated on: Jul 24, 2023 | 4:59 PM

प्रेमाच्या नावाला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. ज्याच्यावर निस्सीम प्रेम केलं त्यानेच तिला मरणाच्या दारात ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गर्लफ्रेंडला बोलावलं, विष पाजलं... अन् मरणाच्या दारात ढकलून पळून गेला तो !
साताऱ्यातील व्यक्तीच्या धमकीमुळे उल्हासनगरमधील दाम्पत्याचे टोकाचे पाऊल
Follow us on

लखनऊ | 24 जुलै 2023 : प्रेम हे सर्वस्व मानणाऱ्या मुलीला तिच्याच प्रियकराने धोका देत मरणाच्या दारात ढकलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुरादाबादमध्ये एका तरूणाने त्याच्या प्रेयसीला भेटायला बोलावलं , तिला विष पाजलं आणि ती बेशुद्ध झाल्यावर मरण्यासाठी त्या निर्दयी तरूणाने तिला तिच्याच घराच्या (boyfriend killed girlfriend) दारात टाकलं आणि तो फरार झाला. या घटनेत त्या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.

अलिशा असे मृत तरूणीचे नाव आहे. २० जुलै रोजी सायंकाळी आरोपी अमन अन्सारी हा अलिशाला बेशुद्धावस्थेत तिच्या घराच्या दारात सोडून पळून गेला, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. घरासमोर बेशुद्ध पडलेल्या आलिशाला घेऊन ते पोलिसांत गेले आणि मदतीची याचना केली. मात्र त्यांना मदत करण्याऐवजी तेथील पोलिसांनी आधी मुलीवर आधी उपचार करून घ्या, नंतर तक्रार दाखल करू असे सांगितले.

मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला जबाब

त्यानंतर कुटुंबीयांनी अलीशाला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले आणि तिच्यावर उपचार सुरू केले. अलीशाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस स्टेषन गाठून अनेकवेळा पोलिसांना अलिशाचा जबाब नोंदवण्याची विनंती केली. असे असतानाही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप लावण्यात आला आहे. अखेर कुटुंबीयांनीच मोबाईलवरून तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून अलिशाचा जबाब नोंदवला. अमन अन्सारी तिला ब्लॅकमेल करत होता आणि त्यानेच तिला विष दिले, असे मृत्यूच्या दारात असलेल्या आलिशाने सांगितले.

याप्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईचीही चौकशी करण्यात येणारा आहे. आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे.