एकीशी प्रेमसंबंध ठेवले, दुसरीशी लग्न जमवले, पण पहिली पिच्छा सोडत नव्हती, मग तरुणाने…

त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. पण तरुणाने प्रेयसीला धोका देत दुसरीशी लग्न ठरवले. यामुळे प्रेयसी नाराज होती. प्रियकराने लग्न मोडण्यासाठी ती प्रयत्न करत होती. पण तिच्या या प्रयत्नांमुळेच पुढे भयंकर घडले.

एकीशी प्रेमसंबंध ठेवले, दुसरीशी लग्न जमवले, पण पहिली पिच्छा सोडत नव्हती, मग तरुणाने...
प्रेमाचे नाटक करुन महिलेवर अत्याचारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 8:18 PM

बैतुल : प्रेमसंबंधातून एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील बैतूल येथे घडली आहे. प्रेमसंबंधात धोका देऊन दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवणाऱ्या प्रियकराला ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा काटा काढला आहे. प्रियकराने बाजारात चाललेल्या प्रेयसीला वाटेत अडवून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. बैतूलच्या मुलताई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सिमरन असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर सनिफ मलिक असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

तरुणी प्रियकराला ब्लॅकमेल करत होती

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनिफ आणि सिमरन यांचे प्रेमसंबंध होते. मात्र नंतर सनिफने सिमरनशी प्रेमसंबंध तोडले आणि दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवले. सनिफचा साखरपुडाही झाला आहे. दोन महिन्यांनी सनिफचे लग्न होणार होते. सिमरन सनिफच्या लग्नाला विरोध करत होती. तसेच तिच्याकडे असलेले दोघांचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलही करत होती. यामुळे सनिफने तिचा काटा काढण्याचा प्लान आखला.

बाजारात अडवले आणि जीवघेणा हल्ला केला

सिमरन ही स्कूटीवरुन बाजारात मटण आणण्यासाठी चालली होती. यावेळी सनिफने तिला वाटेत अडवले आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या सिमरनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच आरोपीला तात्काळ अटक केली. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.