वाईट सवयींना कंटाळून ब्रेकअप करु इच्छित होती तरुणी, मात्र प्रियकराला वेगळाच संशय आला अन्…
तनु आणि सचिन यांच्यात बऱ्याच कालावधीपासून प्रेमसंबंध सुरु होते. मात्र सचिनच्या वाईट सवयींना कंटाळून ती हळू हळू त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करत होती.
रायपूर : ब्रेक अप करु इच्छित होती म्हणून प्रियकराने प्रेयसीची हत्या मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील रायपूरमध्ये उघडकीस आली आहे. रायपूर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. सचिन अग्रवाल असे अटक केलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. तुन कुर्रे असे मयत तरुणीचे नाव असून, रायपूरमधील एका खाजगी बँकेत ती नोकरी करत होती. मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी बेपत्ता तुनचा माग काढत आरोपींपर्यंत पोहचले.
सचिनच्या वाईट सवयींमुळे त्याच्यापासून दूर जाऊ इच्छित होती
तनु आणि सचिन यांच्यात बऱ्याच कालावधीपासून प्रेमसंबंध सुरु होते. मात्र सचिनच्या वाईट सवयींना कंटाळून ती हळू हळू त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करत होती. याच कारणातून सचिनने आधी तनुला 21 नोव्हेंबर रोजी भेटायला बोलावले.
सरप्राईझ देण्याच्या बहाण्याने जंगलात नेले अन्…
सरप्राईझ देण्याच्या बहाण्याने सचिन तनुला छत्तीसगडमधून ओडिशाच्या जंगलात घेऊन गेला. तेथे गेल्यावर त्याने तरुणीवर गोळी झाडत हत्या केली. हत्येनंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. यानंतर तनुच्या घरच्यांसोबत तनु म्हणून काही वेळ चॅटिंगही केले.
काही वेळाने त्याने फोन बंद केला. तनुच्या घरचे तिला फोन करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र फोन बंद येत होता. यामुळे तनुच्या घरच्यांनी पोलिसात धाव घेत मिसिंगची तक्रार दाखल केली.
लास्ट लोकेशनच्या आधारे जंगलात पोहचले पोलीस
पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा तपास सुरु करत तरुणीचे लास्ट लोकेशन तपासले. लास्ट लोकेशनच्या आधारे पोलीस जंगलात पोहचले असता तिथे त्यांना तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले.