Love Dispute : पतीला सोडून प्रियकराकडे गेली, अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकरानेच जिवंत जाळली !

मयत महिलेचा 12 वर्षांपूर्वी तस्मीर नामक व्यक्तीशी विवाह झाला होता. मात्र तीन वर्षापूर्वी तिचे शराफत नामक इसमाशी प्रेमसंबंध जुळले आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी महिला पतीला सोडून गेली होती.

Love Dispute : पतीला सोडून प्रियकराकडे गेली, अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकरानेच जिवंत जाळली !
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 9:24 PM

हरदोई : अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना उत्तर प्रदेशातील हरदोई येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचा अन्य एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे दोघेही प्रेमी जोडपे विवाहित होते. प्रियकरासोबत राहण्यासाठी महिला आपल्या पतीला सोडून आली होती. मात्र त्यानेच तिचा काटा काढला. शराफत असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. महिलेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी शराफतला अटक केली.

पोलिसांना अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता

मिळालेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी रोजी पोलिसांना एक अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.

मृतदेह मिळाल्यानंतर तीन दिवसांनी महिलेची ओळख पटली. मयत महिला रसूलपूर गावची असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी महिलेच्या वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

प्रियकरासाठी पतीला सोडून आली होती महिला

मयत महिलेचा 12 वर्षांपूर्वी तस्मीर नामक व्यक्तीशी विवाह झाला होता. मात्र तीन वर्षापूर्वी तिचे शराफत नामक इसमाशी प्रेमसंबंध जुळले आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी महिला पतीला सोडून गेली होती. यानंतर तिचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क नव्हता.

प्रियकराकडून हत्येची कबुली

महिलेच्या वडिलांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे शराफतला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

शराफतने दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध होते. वारंवार तिला समजावूनही ती ऐकत नसल्याने आपण तिच्या हत्येचा कट रचल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार मित्राच्या मदतीने आधी तिचा गळा आवळला, मग पेट्रोल टाकून जाळल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळावरुन महिलेचा मोबाईल, पर्स, नकाब हस्तगत केले आहे. महिलेला मारल्यानंतर आरोपी तेथन पळून गेले. मात्र पोलिसांनी शराफतला अटक केली असून, त्याच्या साथीदाराचाही शोध सुरु आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.