Boyfriend ची शुल्लक चूक, गर्लफ्रेंडने थेट डोळ्यात घातली सुई, तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं?
cime news : कोणाच्या डोक्यात कधी काय येईल काही सांगता येत नाही. प्रेम करणं चांगली गोष्ट आहे पण तेच प्रेम जीवावर उठल्यासारखं होऊन जातं. ते पण एखाद्या शुल्लक कारणावरून अशा गोष्टी घडताना आपण ऐकतो. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे.
Crime : आजकाल बहुतेक रिलेशनशिप असे असतात ज्यामध्ये कपल्सचा एकमेकांवरती विश्वास नसतो. मग त्यांच्यामध्ये वाद विवाद होणे, एकमेकांवर अविश्वास दाखवणे अशा गोष्टी घडताना दिसतात. तर या वादामध्येच कपल्स एखादं टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. आताही अशीच एक घटना घडली आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एका 44 वर्षीय महिलेने आपला प्रियकर इतर मुलींकडे पाहतो म्हणून त्याच्या डोळ्यात हायपोडर्मिक ‘रेबीज सुई’ने वार केला आहे.
अमेरिकेत राहणारी सँड्रा जिमेनेझ या महिलेने तिच्या प्रियकारावरती हल्ला केला आहे. तिचा प्रियकर इतर मुलींकडे पाहत होता या रागात तिनं हे कृत्य केलं आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिलेचा प्रियकर इतर मुलींना पाहत होता यामुळे त्या महिलेला खूप राग आला होता. त्यामुळे तिने तिच्या प्रियकरासोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यातील वाद इतका वाढला की तिने डायरेक्ट डोळ्यात सुईने हल्ला केला.
25 नोव्हेंबर रोजी सँड्रा जिमेनेझ आणि तिच्या प्रियकराचं भांडण झालं होतं. तिचा प्रियकर इतर मुली का पाहतो याबाबत तिने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्या दोघांमधील वाद इतका वाढला की रागाच्या भरामध्ये तिने प्रियकराच्या डोळ्यात सुईने वार केले. धक्कादायक म्हणजे ही सुई काही सामान्य नसून नसून ती रेबीची सुई होती. रेबीजची सुई सँड्रानं कुत्र्यासाठी आणली होती.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं, सँड्राचा प्रियकर पलंगावर झोपायला गेला होता. त्यावेळी सँड्राने दोन रेबीच्या सुया घेतल्या आणि त्याच्या अंगावरती उडी मारली. रागाच्या भरात तिने ती सुई तिच्या प्रियकराच्या उजव्या डोळ्यात खुपसली. यानंतर सँड्राने घाबरून तिथून पळ काढला. सध्या तिच्या प्रियकरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी सँड्रावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली आहे.