Jalgaon Crime : तीन लाखांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षकासह तिघे एसीबीच्या जाळ्यात, ‘या’ प्रकरणात मागितली होती लाच

एका गुन्ह्यात आरोप दाखल न करण्यासाठी लाच मागणे पोलीस निरीक्षकासह तिघांना चांगलेच महागात पडले आहे. लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime : तीन लाखांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षकासह तिघे एसीबीच्या जाळ्यात, 'या' प्रकरणात मागितली होती लाच
जळगावमध्ये पोलीस निरीक्षकासह तिघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 4:20 PM

जळगाव / 19 जुलै 2023 : एका प्रकरणात समझोता करत त्या बदल्यात लाच स्वीकारणे पोलीस निरीक्षकासह तिघांना चांगलेच महागात पडले आहे. तिघांनाही धुळे लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. आरोपींमध्ये भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह रायटर आणि खासगी पंटर यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. आरोपींनी फिर्यादीकडे भुसावळ बायोडिझेलच्या दाखल गुन्ह्यात प्रकरणात सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रूपयांची लाच मागितली होती. धुळे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संतोष पावरा, पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला, पोलीस कॉन्स्टेबल चालक सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली.

बायोडिझेल प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली लाच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याच्या मित्रावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात बायोडिझेल प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बायोडिझेल वाहतूक करणारा टँकर पकडला होता. यानंतर सदर टँकर बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडे 5 लाखांची मागणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केली होती.

रोकड स्वीकारताना रंगेहाथ पकडले

तडजोडीअंती 3 लाख रूपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार धुळे पथकाने मंगळवारी 18 जुलै रोजी सापळा रचला. त्यानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड आणि रायटर पोलीस नाईक तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून खासगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला याने तक्रारदारकडून 3 लाख रूपयांची लाच स्वीकारली. यावेळी धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.