सात दिन बाद… लग्नानंतर नववधू माहेरी गेली ती परतलीच नाही, शोधाशोध केल्यावर जे समोर आलं…

लग्नानंतर घरच्यांना भेटण्यासाठी नववधू माहेरी गेली होती. तेथून ती दुकानात जाण्यासाठी बाहेर पडली , मात्र ती परत आलीच नाही. म्हणून शोधाशोध केली असता जे सत्य समोर आलं ते पाहून घरच्यांचा पायाखालची जमीनच सरकली.

सात दिन बाद... लग्नानंतर नववधू माहेरी गेली ती परतलीच नाही, शोधाशोध केल्यावर जे समोर आलं...
marriage
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 10:28 AM

लखनऊ : लग्नानंतर नववधू सासरी गेली. काही दिवसांनी माहेरच्यांची आठवण येऊ लागली म्हणून भेटण्यासाठी घरी गेली होती. मात्र ती परतच आली नाही. घरच्यांनी भरपूर शोधाशोध केल्यानंतर एक धक्कादायक समोर आल्याने सर्वच अवाक् झाले. माहेरी परत आल्यानंतर ही तरूणी सामान आणण्यासाठी बाहेर पडली होती. दिवास गेलेली ती रात्री उशीरापर्यंत घरी आली नाही म्हणून घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी तिचा खूप शोध घेतला , पोलिसांतही तक्रार दाखल केली असता, ती तिच्या प्रियकरासोबतच पळून गेल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर ती घरातील दागिने आणि रोख रक्कमही घेऊन गेल्याने सर्वांनाच मनस्ताप झाला आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथील ही घटना आहे. नवविवाहित तरुणी लग्नानंतर प्रियकरासह पळून गेली. असे सांगितले जात आहे की, 31 मे रोजी मुलीचे लग्न झाले होते, त्यानंतर ती आपल्या कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने तिच्या माहेरच्या घरी आली होती. पण तिचा काही वेगळाच प्लॅन होता. काही सामान घ्यायचे आहे असे घरच्यांना सांगून ती बाजारात जाण्यास निघाली. त्यानंतर ती तिथून प्रियकरासह पळून गेली.

यासोबतच तिने घरातून दागिने आणि रोख रक्कमही नेली आहे. मुलगी घरी न परतल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी मुलीला फोन केला पण स्वीच ऑफ येत होता. त्यानंतर नातेवाईकांसह वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. परंतु नवविवाहित तरूणीबद्दल काहीच कळू शकले नाही.

शेवटी कळले की ती नववधू तिच्याच भावाच्या सासरच्या एका नातेवाईकासोबत पळून गेली होती. व्यथित झालेल्या वडिलांनी दोन तरुणांच्या नावे एफआयआर दाखल केला आहे. आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.

6 जून ला माहेरी आली होती

हे प्रकरण नरैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी 31 मे 2023 रोजी कालिंजर पोलीस स्टेशन परिसरात आपल्या मुलीचे लग्न लावून दिले होते. ६ जून रोजी मुलगी माहेरी परतली. त्यानंतर 11 जून रोजी ती वस्तू घेण्याच्या बहाण्याने बाजारात गेली आणि परत आलीच नाही. मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला.

त्यानंतर मुलगी प्रियकरासह पळून गेल्याचे वडिलांना समजले. यासोबतच घरातून रोख रक्कम आणि दागिनेही नेले आहेत. मुलीचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून मुलीच्या भावाचा सासरचा नातेवाईक आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस नवविवाहित महिलेचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी यांनी सांगितले की, मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या तिचा शोध सुरू आहे. लवकरच मुलीला शोधण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल असे समजते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.