प्रेमविवाह केल्याचा राग, भावाकडून बहिणीचं खुरप्यानं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या गुढे गावात ही घटना घडली आहे. गुढे गावात एका मुलीनं घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केला. या विवाहाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे संतापलेल्या भावानं आपल्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करत खुरप्यानं तिचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केला.

प्रेमविवाह केल्याचा राग, भावाकडून बहिणीचं खुरप्यानं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं
कोल्हापुरात भावाकडून बहिणीवर हल्ला
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 11:31 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात एक भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आलाय. बहिणीने घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीवर प्राणघातक हल्ला केला. चक्क खुरप्यानं बहिणीचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केलाय. सुदैवानं या हल्ल्यात बहिण थोडक्यात बचावली आहे. पण या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Brother attacked the sister out of anger over her sister’s love marriage against the wishes of the family in Kolhapur)

काय आहे घटना?

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या गुढे गावात ही घटना घडली आहे. गुढे गावात एका मुलीनं घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केला. या विवाहाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे संतापलेल्या भावानं आपल्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करत खुरप्यानं तिचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र, ती या हल्ल्यात बालंबाल बचावली. खुरप्याने वार केल्यानं बहिणीच्या पाठीवर आणि मानेवर जखमा झाल्या आहेत.

पन्हाळा मार्गावर तरूणाला बेदम मारहाण

पन्हाळ्याच्या गुढे गावात ही थरारक घटना घडलेली असताना दुसरीकडे कोल्हापुरातच पन्हाळा मार्गावर एका तरुणाला बेदम माहराण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वरातीत नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून या तरूणाला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तरूणाला मारहाण करत असताना टोळक्याने तरूणाची सोन्याची चेन आणि रोख रक्कमही लंपास केल्यासं समोर येत आहे. त्यामुळे या मारहाण करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

गाडी अडवत लाकडी दांडक्याने मारलं

वरातीत नाचल्याचा राग मनात ठेवून संतापलेल्या टोळक्याने आधी तरूणाची गाडी अडवली. त्याला गाडीतून बाहेर काढत त्याच्यावर टोळक्यानं हल्ला केला. लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने तरूणाला रस्त्यावरच बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ कोल्हापुरात व्हायरल होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.