पत्नीसह गृहप्रवेश केला, पण मेहुणीमुळे तो थेट गजाआड गेला… असं काय झालं ?

मध्य प्रदेशात एका वराला त्याच्या लग्नानंतरच अटक करण्यात आली. त्याच्या मेहुणीचे बोलणं ऐकताच तो थेट तुरूंगात गेला. असं काय सांगितलं तिने ?

पत्नीसह गृहप्रवेश केला, पण मेहुणीमुळे तो थेट गजाआड गेला... असं काय झालं ?
लग्नानंत वर थेट तुरूंगात पोहोचला
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 12:28 PM

मध्य प्रदेशमध्ये एक अजब मामला समोर आला आहे. तेथे एका तरूणाचे लग्न होतं, पण लग्न लागून तो घरात येतो न येतो तोच त्याची थेट तुरूंगात रवानगी झाली. त्याच्या मेहुणीमुळेच त्याला जेलची हवा खावी लागली. नवविवाहीत वधूसोबत तो गृहप्रवेश करत असातानाच पोलिस तेथे पोहोचले. लग्नघरात पोलिसांना पाहून सर्वच अवाक् झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वराच्या मेहुणीनेच त्याच्यावर फसवणुकीचे आरोप लावले एवढेच नव्हे तर पाच वर्षांपासून नातं असल्याचं सांगत, धोका दिल्याचा आरोप तिने केला. त्या वराच्या मेहुणीने त्याच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे तरुणाला अटक करण्यात आली.

पाच वर्ष शरीरसंबंध

शिवकांत रावत असे आरोपीचे नाव असून तो आरोग्य विभागात कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारीत पीडितेने नमूद केल्यानुसार, आरोपी हा तिच्या बहिणीचा दीर असून त्याने पीडितेला लग्नाचे खोटे वचन दिले आणि 5 वर्ष तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. मात्र त्यानंतर त्या युवकाने पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला आणि दुसऱ्या मुलीशीच विवाह केला. हे प्रकरण तिघरा गावातील आहे. आरोपी तरूणाचं मऊगंज जिल्ह्यातील लौर गावातील तरूणीशी लग्न झालं होतं.

तक्रार दाखल होताच पोलिसांची कारवाई

पीडितेच्या तक्रारीवरून तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली. तेव्हा तो लग्नानंतर वधूसोबत त्याच्या घरी पोहोचला. गृहप्रवेश करण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. कलम ३७६ आणि ३७६ (२) एन अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमिकेला धोका

नुकतेच फतेहपूरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता. जिल्ह्यात एका तरुणाने लग्नाच्या बहाण्याने प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले. 5 वर्ष शारीरिक संबंध राखले आणि ती मुलगी गरोदर झाल्यावर औषध देऊन तिचा गर्भपात करून दुसऱ्या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.