बहिणीला पती वारंवार त्रास द्यायचा, मेव्हण्याने भावोजीचा काढला काटा

मयत इसम आणि त्याची पत्नी यांच्यात सतत वाद होत असून याच रागातून आरोपीने मयत महेंद्र याच्या मानेवर आणि डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.

बहिणीला पती वारंवार त्रास द्यायचा, मेव्हण्याने भावोजीचा काढला काटा
काळा रंग पसंत नव्हता म्हणून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 7:06 PM

पालघर / जितेंद्र पाटील (प्रतिनिधी) : बहिणीला नवरा त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच बहिणीचे कुंकू पुसल्याची घटना मोखाडा तालुक्यात उघडकीस आली आहे. मेव्हण्याने भावोजीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. महेंद्र दामू भोईर असे हत्या करण्यात आलेल्या 30 वर्षीय इसमाचे नाव आहे. तो मोखाडा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी होता. मयत इसम आणि त्याची पत्नी यांच्यात सतत वाद होत असून याच रागातून आरोपीने मयत महेंद्र याच्या मानेवर आणि डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी मोखाडा पोलिसांनी आरोपीला अवघ्या बारा तासांच्या आत अटक केली. आरोपीवर मोखाडा पोलीस ठाण्यात 302 सह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयताचे पत्नीसोबत वारंवार भांडण व्हायचे

मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे राहणाऱ्या महेंद्र भोईर आणि त्याच्या पत्नीचे एकमेकांसोबत वारंवार भांडण व्हायचे. बहिणीला तिचा नवरा त्रास देत असल्याने भावाच्या मनात भावोजीबद्दल राग होता.

मेव्हण्यानेच भावोजीला संपवले

याच रागातून त्याने महेंद्र याच्या मानेवर आणि डोक्यावर वार करुन त्याची हत्या केली. याप्रकरणी मोखाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी कसून शोध घेत 12 तासाच्या आत फरार आरोपीला अटक केली.

हे सुद्धा वाचा

नालासोपाऱ्यात लिव्ह इन पार्टनरकडून प्रेयसीची हत्या

नोकरी धंदा करण्याच्या वादातून लिव्ह इन पार्टनरनेच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळिंज पोलिसांनी राजस्थान बॉर्डवरुन आरोपीला अटक केली आहे.

प्रेयसीची हत्या करुन मृतदेह बेडमध्ये टाकला. त्यानंतर घरातील वस्तू विकून पैसे घेऊन आरोपी फरार झाला. मात्र मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि हत्येचा उलगडा झाला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.