भिवानी | 19 ऑगस्ट 2023 : प्रेमात आंधळा झालेल्या एका इसमाने त्याच्या मोठ्या वहिनीची निर्घृण हत्या (crime news) केली. हैराण करणारी गोष्ट म्हणजे वहिनीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. हे संपूर्ण प्रकरण हरियाणातील भिवानीच्या तिगडाना गावातील आहे. तेथे 17 ऑगस्ट रोजी 35 वर्षांच्या महिलेची दिवसाढवळ्या, तिच्या घरातच निर्घृण हत्या करण्यात आली.
या हत्येचे वृत्त कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेच्या पतीने त्याच्या मावस भावावर हत्येचा आरोप लावला. याच आधारावर तपास करताना पोलिसांनी आरोपी दीपक याला अटक केली व त्याला हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रासह मीडियासमोर हजर करण्यात आले.
दीपक याचे गेल्या चार वर्षांपासून त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या वहिनीशी प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.याच रागातून दीपक याने 17 ऑगस्ट रोजी सकाळी वहिनीच्या गळ्यावर वार करून क्रूरपणे तिची हत्या केली. प्रेमात आंधळ्या झालेल्या दीराला पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.