प्रॉपर्टीवरुन रक्ताचे नातेही विसरले, चुलत भावानेच भावोजीच्या मदतीने तरुणासोबत केले ‘असे’ !
दोन भावांमध्ये मालमत्तेवरुन वाद होता. अखेर वाद मिटवण्यासाठी भावाने बहिणी आणि भावोजींच्या मदतीने जे केले ते पाहून नात्यांवरील विश्वास उडेल.
दिल्ली : प्रॉपर्टीच्या वादातून एका तरुणाची त्याच्याच दोन नातेवाईकांनी हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री दिल्लीतील त्रिलोकपुरी भागात घडली. ही घटना घडल्यानंतर आरोपींनी या तरुणाला व्हॅनमध्ये बसवून दोन किमी अंतरावरील कोंडली येथील नाल्यात फेकून दिले. बुधवारी सकाळी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीचा मेव्हणा आणि चुलत भावाला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नौशाद आणि मकरुद्दीन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नौशादला गाझियाबादच्या विजय नगर परिसरातून अटक करण्यात आली.
मालमत्तेवरुन सुरु होता वाद
नौशादची चौकशी केली असता, मालमत्तेवरून त्याचा मेव्हणा इम्रान याच्याशी आर अँड आर कॉलनी त्रिलोकपुरीमधील मालमत्तेवरुन वाद झाल्याचे निष्पन्न झाले. नौशाद आणि इम्रानचा चुलत भाऊ मकरुद्दीन यांच्याशिवाय इमरानच्या दोन बहिणींना हा फ्लॅट घ्यायचा होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकला
भावेजीने इम्रानची हत्या केल्यानंतर मकरुद्दीनने व्हॅन चालक गौरवच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. या घटनेत मृत इम्रानच्या दोन बहिणी नर्गिस आणि नसरीन यांचीही भूमिका सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. मयत इम्रान हा अविवाहित आणि बेरोजगार होता. तसेच आपल्या बहिणींसोबत राहत होता.
सर्व आरोपींना पोलिसांकडून अटक
मंगळवार-बुधवारी रात्रीच्या सुमारास कोंडली नाल्यात मृतदेह पडल्याची माहिती एका प्रवाशाने पोलिसांना दिली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवली. ओळख पटल्यानंतर लगेचच पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत आरोपी नौशादला अटक केली. यानंतर नौशादचे साथीदार मकरुद्दीन आणि नसरीन आणि नर्गिस यांनाही अटक करण्यात आली आहे.