बहिणीपासून दूर रहा म्हणाला, पण तरुण ऐकत नव्हता, मग चहा पिण्यासाठी म्हणून गेला तो परतलाच नाही !

बहिणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. पण तरुणीच्या भावाला हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे त्याने जे केले त्यानंतर थेट तुरुंगवासच नशीबी आला.

बहिणीपासून दूर रहा म्हणाला, पण तरुण ऐकत नव्हता, मग चहा पिण्यासाठी म्हणून गेला तो परतलाच नाही !
बहिणीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने भावानेच तरुणाला संपवले
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 12:32 PM

पटना : बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे नाराज भावाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील पटना येथे उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राज कुमार असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी प्रेयसीचा भाऊ अभिषेक कुमार याला अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. या हत्याकांडानंतर पाटणा शहर एएसपीच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली आणि टीमच्या सदस्यांनी दोन दिवसांत या हत्येचा छडा लावला.

बहिणीशी प्रेमसंबंध होते म्हणून तरुणाला संपवले

राज कुमारचे मलसलमी येथील रहिवासी अभिषेक कुमार याच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. अभिषेकला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तो संतापला. अभिषेकने राजला बहिणीपासून दूर राहण्याची वारंवार ताकीद देऊनही राज ऐकत नव्हता. यानंतर अभिषेकने राजच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार त्याने 26 एप्रिल रोजी चहा पिण्याच्या बहाण्याने राजला गूळ बाजारात बोलावले. त्यानंतर अभिषेकने राजवर दोन वेळा गोळ्या झाडल्या. यात काज जागीच ठार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन खोकेही जप्त केले आहेत.

प्रत्यक्षदर्शी आणि राजचा मित्र श्रवणच्या माहितीनंतर हत्याकांडाचा उलगडा

घटनेच्या वेळी उपस्थित असलेला राजचा मित्र श्रवण कुमार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. श्रवण कुमारने पोलीस चौकशीत हत्याकांडाचा उलगडा केला आणि राज कुमारच्या प्रेमसंबंधाबाबत पोलिसांना माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचे तांत्रिक संशोधन करून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

हे सुद्धा वाचा

यानंतर पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी अभिषेकवर हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.