नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई, अंमली पदार्थांची विक्री करण्याऱ्या दोघांना बेड्या

नवी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची विक्री करण्याऱ्या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. | Brown Sugar Drugs seized

नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई, अंमली पदार्थांची विक्री करण्याऱ्या दोघांना बेड्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 11:03 AM

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai police) धडक कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची विक्री (Brown Sugar Drugs seized) करण्याऱ्या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रुपये 5 लाख किमतीचे ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. (Brown Sugar Drugs seized in navi mumbai two Accussed arrested)

वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सलीम रहमान इनामदार यांना 11 मार्च रोजी सुत्रांकडून वाशी सेक्टर 10 येथील श्रद्धा इमारती जवळ काही लोक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. इनामदार यांनी सदर बाब आपल्या वरिष्ठांना सांगितली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सापळा रचला.

अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा बी जी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांच्या टीमने या परिसरात सापळा रचला त्यावेळी येथे 2 व्यक्ती संशयास्पद आढळून आल्या त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ मिळून आला त्याची किंमत जवळपास ५ लाख असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अंमली पदार्थांची विक्री करण्याऱ्या दोघांना बेड्या

त्याचबरोबर आरोपींकडून होंडा अॅक्टिव्हा ही दुचाकीही हस्तगत करण्यात आली सर्व मुद्देमालाची किंमत साडेसहा लाख आहे. या दोन्ही आरोपीना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांवर मानवी आरोग्यावर परिणाम करणारे पदार्थ NDPS अधिनियम 1985 कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून हे आरोपी सदर ब्राऊन शुगर कोणाला विकण्यास आले होते त्याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंबरनाथमध्ये मेफोड्रॉन एम.डी अमली पदार्थ जप्त

अंबरनाथमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफोड्रॉन एम.डी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका तरुणास अटक केली असून यावेळी त्याचा आणखी एक साथीदार पोलिसांच्या तावडीतून निसटला. मिळालेल्या माहितीनुसार, बबलू उर्फ विवेक मोरे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा साथीदार संजय गायकवाड फरार आहे अशा माहिती अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.

(Brown Sugar Drugs seized in navi mumbai two Accussed arrested)

हे ही वाचा :

अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेच्या नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, लातुरात अधिकाऱ्यावर गुन्हा

“आयुष्य मनासारखं जगता येत नसल्याची तक्रार”, नाशिकमध्ये नैराश्यग्रस्त आईचा दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.