नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai police) धडक कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची विक्री (Brown Sugar Drugs seized) करण्याऱ्या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रुपये 5 लाख किमतीचे ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. (Brown Sugar Drugs seized in navi mumbai two Accussed arrested)
वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सलीम रहमान इनामदार यांना 11 मार्च रोजी सुत्रांकडून वाशी सेक्टर 10 येथील श्रद्धा इमारती जवळ काही लोक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. इनामदार यांनी सदर बाब आपल्या वरिष्ठांना सांगितली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सापळा रचला.
अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा बी जी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांच्या टीमने या परिसरात सापळा रचला त्यावेळी येथे 2 व्यक्ती संशयास्पद आढळून आल्या त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ मिळून आला त्याची किंमत जवळपास ५ लाख असल्याची प्राथमिक माहिती आहे.
त्याचबरोबर आरोपींकडून होंडा अॅक्टिव्हा ही दुचाकीही हस्तगत करण्यात आली सर्व मुद्देमालाची किंमत साडेसहा लाख आहे. या दोन्ही आरोपीना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांवर मानवी आरोग्यावर परिणाम करणारे पदार्थ NDPS अधिनियम 1985 कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून हे आरोपी सदर ब्राऊन शुगर कोणाला विकण्यास आले होते त्याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंबरनाथमध्ये मेफोड्रॉन एम.डी अमली पदार्थ जप्त
अंबरनाथमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफोड्रॉन एम.डी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका तरुणास अटक केली असून यावेळी त्याचा आणखी एक साथीदार पोलिसांच्या तावडीतून निसटला. मिळालेल्या माहितीनुसार, बबलू उर्फ विवेक मोरे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा साथीदार संजय गायकवाड फरार आहे अशा माहिती अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.
(Brown Sugar Drugs seized in navi mumbai two Accussed arrested)
हे ही वाचा :
अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेच्या नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, लातुरात अधिकाऱ्यावर गुन्हा