नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात बिल्डिंगच्या पार्किंग आग; आगीत 7-8 गाड्या जळून खाक
या आगीत 7-8 गाड्या जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. तर ही आग रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा संशय व्यक्त गेला जात आहे.
नाशिक : येथील पाथर्डी फाटा (Pathardi Fata) परिसरात असणाऱ्या एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे येथे एकच गोंधळ उडाला आहे. तर या आगीत (Fire) 7-8 गाड्या जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. तर ही आग रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) आग लागल्याचा संशय व्यक्त गेला जात आहे. तर ही घटना पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात असणाऱ्या मल्हार रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या वाहनतळात मध्यरात्री दीड वाजेच्यासुमारास घडली. तर यात 7-8 गाड्या जळून खाक झाल्या. पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात मल्हार रेसिडेन्सी अपार्टमेंट आहे. काल रात्री (मंगळवारी) मध्यरात्रीच्या सुमारास पार्किंगमध्ये अचानक आग लागली. यात 7-8 गाड्या जळून खाक झाल्या. त्यादरम्यान धुराचे लोट उठल्याने आणि एका पाठोपाठ मोठे आवाज झाल्याने रहिवाशी जागे झाले. आणि त्यांनी आपआपल्या बाल्कनीमध्ये येऊन पाहू लागले. त्यावेळी त्यांना पार्किंगमध्ये आग लागल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी याची माहीती पोलिसांना दिली.
नाशिकमध्ये शिवशाही बसला
दरम्यान नाशिकमध्ये आगीच्या घटना या समोर येतच आहेत. याच्याआधीही येथे नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर शिवशाही बसला आग लागल्याची घटना समोर आली होती. निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे ही घटना घडली होती. तर औरंगाबाद येथून ही गाडी नाशिककडे जात होती. मात्र, येवला तालुक्यातल्या देशमाने येथे ही गाडी अचानक बिघडली. बसमधून जवळपास दहा ते पंधरा प्रवासी प्रवास करत होते. मात्र, बस बंद पडल्याने त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले होते. त्यानंतर बिघडलेल्या बसने अचानक पेट घेतला होता. दैवबलवत्तर म्हणून त्यावेळी कोणतीही जीवित हाणी झाली नव्हती.
एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला आग
तर नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एमजी रोड परिसरात असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे धुराचे प्रचंड लोट उठले होते. यावेळी या दुकानासह गोडाऊनमधील लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला होता. नाशिकमधील जाधव मार्केट परिसरात व्यापारी संकुलातील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला आग लागली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरलं होतं.