Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण! बुलढाण्यात पत्रा बाहेर आलेल्या धावत्या एसटी बसने दोघांचे हात कापले, 3 जण जखमी

Buldana ST Bus Accident : मलकापूर वरून पिंपळगाव देवीसाठी एक एसटी निघाली होती. या एसटी बसमुळे तिघे जण जायबंदी झालेत. सदर एसटी बसचा चालकाच्या बाजूने पत्रा बाहेर निघालेला होता. चालकाच्या निष्कळजीपणामुळे दोघांना आपला हात गमावावा लागला आहे.

भीषण! बुलढाण्यात पत्रा बाहेर आलेल्या धावत्या एसटी बसने दोघांचे हात कापले, 3 जण जखमी
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 10:31 AM

बुलढाणा : बुलढाणा (Buldana Crime News) जिल्ह्यातील मलकापूर ते पिंपळगाव देवी (Malakapur to Pimpalgaon Devi) इथं जाणाऱ्या एसटी बसमुळे भीषण अपघात झाला. या एसटी (Buldana ST Bus Accident) बसच्या बाहेर आलेल्या पत्र्यामुळे तिघेजण गंभीर जखमी झाले. तर दोघांचे हात कापले गेलेत. यातील एकाचा हात तुटून दुसऱ्या बाजूला फेकला गेला. तर तिसरा व्यक्ती गंभीर जखमी झालाय. सध्या तिन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण दोघांची मृत्यूशी झुंज सुरु असून त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय.

चालकाच्या निष्काळजीपणा हा प्रकार घडला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलीय. एसटी बसला धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे. पोलिसांकडून सध्या पुढील कारवाई सुरु आहे.

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

हे सुद्धा वाचा

कसा घडला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साधारण 5 वाजता मलकापूर वरून पिंपळगाव देवीसाठी एक एसटी निघाली होती. या एसटी बसमुळे तिघे जण जायबंदी झालेत. सदर एसटी बसचा चालकाच्या बाजूने पत्रा बाहेर निघालेला होता. चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोघांना आपला हात गमावावा लागला आहे.

वाचले, पण..

या भीषण अपघातामधे 50 वर्षीय परमेश्वर सुरळकर हे शेतात जात असताना तर 23 वर्षीय विकास पांडे यांचा सकाळी धावण्यासाठी गेले असता हा अपघात घडला. दरम्यान, तिसरा व्यक्ती रोडच्या बाजूला शौचास बसलेला होता. त्याला देखील भरधाव एसटी बसने जखमी केलं. प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबाबत माहिती दिली.

या भीषण अपघातानंतर एसटी बस चालकाविरोधात स्थानिकानी तीव्र संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी चालक सूर्यवंशी याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लोकांनी केली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. अपघातग्रस्त बसही पोलिसांनी ताब्यात घेतलीय.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची मृत्यूशी झुंज सुरु असून एकाचा तर हात जागच्या जागीच कापला गेल्याची माहिती त्यांनी दिली.

एसटी बसच्या चालकाचं नाव सूर्यवंशी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यात बुलढाण्यातील आवा गावचे परमेश्वर सुरळकर, विकास पांडे यांच्यासह शंकर पवार असे तिघे जण जखमी झालेत, असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.