मोबाईलवर खेळू नकोस, बाबा ओरडल्याचा राग, मुलाकडून बँक अधिकारी वडिलांची कुऱ्हाडीने हत्या

वडील आरोपी शुभमला जास्त वेळ मोबाईल पाहू नकोस, अभ्यास कर यावरुन सतत रागावत असत.(Buldana Son attacks father with axe)

मोबाईलवर खेळू नकोस, बाबा ओरडल्याचा राग, मुलाकडून बँक अधिकारी वडिलांची कुऱ्हाडीने हत्या
बुलडाण्यात मुलाकडून वडिलांची हत्या
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 2:39 PM

बुलडाणा : मोबाईलवर सारखं खेळण्यावर टोकणाऱ्या वडिलांची मुलाने हत्या केली. कुऱ्हाडीने वार करुन पोटच्या मुलाने बँक अधिकारी वडिलांची हत्या केल्याची घटना बुलडाण्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण विद्यार्थी असल्याची माहिती आहे. (Buldana Crime News College Going Son attacks father with axe to death after fight over Mobile Phone)

मयत वडील बँकेत शाखा व्यवस्थापक

गजानन संपत गवई असं मृत्युमुखी पडलेल्या 55 वर्षीय वडिलांचं नाव आहे. ते अमडापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील समतानगर परिसरात पत्नी आणि मुलासह राहत होते. त्यांचा 21 वर्षीय मुलगा शुभम इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो. तर त्यांना चार विवाहित मुली आहेत.

मोबाईल पाहण्यावरुन वारंवार खटके

शुभमला सतत मोबाईल पाहण्याची, सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्याची सवय होती. वडील शुभमला जास्त वेळ मोबाईल पाहू नकोस, अभ्यास कर यावरुन रागावत असत. मोबाईल पाहण्यावरुन दोघांमध्ये रविवारी पुन्हा वाद झाला. त्यानंतर शुभमने कुऱ्हाडीने वार करुन वडील गजानन गवई यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे समतानगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी मुलाला अटक

आरोपी मुलगा शुभम गवईला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

बहीण-भावाच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या पित्याची हत्या

पुण्यातील कात्रज-देहू रोड बायपसजवळ एका रहिवासी इमारतीत काम करणाऱ्या वॉचमनची गेल्या आठवड्यात मुलाने हत्या केली होती. दोन मुलगे, दोन मुली आणि पत्नीसह इमारतीच्या पार्किंग लॉटमध्येच तो राहत होता. तो घरात कांदा चिरत बसला असताना त्याचा 13 वर्षांचा मुलगा आणि एक मुलगी भांडत असल्याचं त्याला दिसलं. त्याने दोघांचं भांडण सोडवत मध्यस्थी केली. वडील ओरडल्याचा राग मुलाला आला. त्याने वडिलांनी कांदा चिरण्यासाठी घेतलेली सुरी उचलली आणि त्यांच्याच पोटात खुपसली. एकच घाव वर्मी बसला आणि वॉचमन जागच्या जागी कोसळला. रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या : 

शेजाऱ्यांशी भांडणाचा जाब विचारल्याने राग, वडील आणि भावाची चाकूने हत्या

बहिणीसोबत भांडताना ओरडल्याचा राग, पुण्यात 13 वर्षांच्या मुलाने कांदा चिरताना वडिलांना भोसकलं

(Buldana Crime News College Going Son attacks father with axe to death after fight over Mobile Phone)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.