लग्न जुळत नसल्यानं तरुणानं जीवनयात्रा संपवली, सरण रचून आत्महत्या! बुलडाण्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला

बुलडाणा : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना बुलडाणाच्या (Buldhana) खामगाव तालुक्यातील पळशी इथं घडलीय. एका 28 वर्षीय तरुणानं लग्न जमत नसल्यामुळं टोकाचं पाऊल उचललं. महेंद्र बेलसरे (Mahendra Belsare) हा तरुण लग्न जमत नसल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकला आणि त्यातूनच त्याने सरण रचून आत्महत्या (Suicide) केली! महेंद्र बेलसरे या तरुणाने स्वत:च्या शेतात सरण रचून स्वत:ला पेटवून घेतलं […]

लग्न जुळत नसल्यानं तरुणानं जीवनयात्रा संपवली, सरण रचून आत्महत्या! बुलडाण्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला
लग्न जुळत नसल्यामुळे तरुणाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 10:52 PM

बुलडाणा : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना बुलडाणाच्या (Buldhana) खामगाव तालुक्यातील पळशी इथं घडलीय. एका 28 वर्षीय तरुणानं लग्न जमत नसल्यामुळं टोकाचं पाऊल उचललं. महेंद्र बेलसरे (Mahendra Belsare) हा तरुण लग्न जमत नसल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकला आणि त्यातूनच त्याने सरण रचून आत्महत्या (Suicide) केली! महेंद्र बेलसरे या तरुणाने स्वत:च्या शेतात सरण रचून स्वत:ला पेटवून घेतलं आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. महेंद्र हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असल्यानं बेलसरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तसंच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

महेंद्रने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं?

महेंद्र बेलसरे हा खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द या गावाचा रहिवासी होता. त्याचं वय 28 वर्षे होतं. त्याच्या कुटुंबाकडे 3 एकर बागायती शेती आहे, तर दुसऱ्यांची त्यांनी 8 ते 10 एक शेती ते कसत होते. मागील अनेक दिवसांपासून महेंद्रसाठी मुलगी पाहण्याचं काम सुरु होतं. मात्र, त्याचे लग्न काही केल्या जमत नव्हते. यामुळे महेंद्र नैराशाच्या गर्तेत अडकला. अशा परिस्थितीत बुधवारी गावात 2 लग्न समारंभ होते. गावातील जवळपास सर्वजण या लग्न सोहळ्याकडे होते. तेव्हा महेंद्र आपल्या शेतात गेला. तिथे त्यांने सरण रचलं. अंगावर पेट्रोल ओतून घेत तो सरणावर चढला आणि स्वत:ला पेटवून घेतलं. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकरी महेंद्रच्या शेताकडे धावले. मात्र, तोपर्यंत सर्वकाही संपलं होतं.

मागील काही दिवसांपासून महेंद्रचं लग्न जुळवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, लग्न जुळत नसल्यामुळे महेंद्र सतत नाराज असायचा. या नैराश्यातूनच त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याच गावकरी सांगतात. याबाबत बुलडाणा पोलीस पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या : 

Breaking : दिल्लीत सीमापुरी भागात संशयास्पद बॅग सापडल्यानं खळबळ, स्पेशल सेल आणि NSG कडून तपास सुरु

‘मेरा पैसा वापस कर’, मोहित कंबोजचं संजय राऊतांना उद्देशून ट्विट, त्याच ट्विटवरचे हिडन पब्लिक मेसेज वाचलात का?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.