शिवजयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिस निरीक्षकाने तक्रार सोशल मीडियात व्हायरल केल्याचा आरोप
अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करावी, तसेच पिंपळगाव राजा पोस्टेमध्ये पीडित महिला तक्रार देण्यासाठी गेली होती. सहा ते रात्री बारापर्यंत बसून ठेवत तक्रार न घेता सदर महिलेच्या तक्रारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या ठाणेदारांसह संबंधितावर कारवाई करावी.

गणेश सोळंकी, बुलढाणा : शिव जयंतीदिनी (Shiv jayanti 2023) बुलढाण्यात (Buldhana) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (buldhana collector office) एका महिलेने आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला आहे. आरोपींवर कारवाई न करता पिंपळगाव राजा पोलिस निरीक्षकाने पीडित महिलेची तक्रार सोशल मीडियात व्हायरल केल्याचा आरोप महिलेने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला. विषारी औषध घेतल्यामुळे तिथं असलेल्या लोकांची पळापळ सुरु झाली. अखेरीत तिथं असलेल्या साध्या वेश्यातील पोलिसांनी त्या महिलेला तिथल्या समान्य रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. त्या महिलेवरची सध्या प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहेत.
शिवजयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करावी, तसेच पिंपळगाव राजा पोस्टेमध्ये पीडित महिला तक्रार देण्यासाठी गेली होती. सहा ते रात्री बारापर्यंत बसून ठेवत तक्रार न घेता सदर महिलेच्या तक्रारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या ठाणेदारांसह संबंधितावर कारवाई करावी. या मागणीसाठी वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने एका पंचवीस वर्षीय महिलेने शिवजयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.



साध्या वेशातील पोलिसांनी या महिलेला तत्काळ सामान्य रूग्णालयात दाखल…
मात्र घटनास्थळी उपस्थित साध्या वेशातील पोलिसांनी या महिलेला तत्काळ सामान्य रूग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती स्थिर आहे. नांदुरा पोस्टे अंतर्गत 15 फेब्रुवारीला पिडीत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल असून तक्रारीतील आरोपींना त्वरित अटक करावी. यासाठी पीडित महिलेने जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र सरकारला निवेदन देऊन आत्महत्या करण्याचा इशाराही दिला होता. परंतु प्रशासनाने कोणतीही दखल न घेता आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. पिडीतेची तक्रार सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पिंपळगाव राजा ठाणेदार व संबंधितावर कारवाई झाली नाही. त्यामुळे सदर महिलेने शिवजयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषारी औषध घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर पीडित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.