शेतीच्या वादातून दोघांची हत्या, मिरची पावडर टाकली आणि मग…, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Buldhana crime news : शेतीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये जोरदार वाद झाला. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे सगळं करीत असताना सुरुवातीला आरोपींनी डोळ्यात मिरची पूड टाकली.
गणेश सोळंकी, बुलढाणा : देशात शेतीच्या वादामुळे भावाभावात भांडण झाल्याचं नवीन नाही. अनेकदा दोन कुटुंबात झालेल्या वादात अनेकांचा जीव सुध्दा गेला आहे, अशीचं घटना नुकतीचं बुलढाणा (maharashtra buldhana) जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल केला आहे. त्यापैकी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची पोलिस (buldhana police) कसून चौकशी करणार आहेत. शेतीच्या वादातून दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली आहे. ही घटना घडल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. वरिष्ठ पोलिसांनी (Buldhana Crime news) या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शेतीच्या वादातून दोघांचा खून झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चींचपूर येथील ही घटना आहे. ज्यावेळी दोघांची हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्ह्यात पसरली. त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. हिवरखेड पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर 7 जणांना अटक केली आहे.
नेमकं काय झालं
बुलढाणा जिल्ह्यात शेतीच्या वादातून दोन जणांचा खून करण्यात आला आहे. खामगाव तालुक्यातील चिंचपूर गावात शेतीच्या जुन्या वादातून दोन जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी संशयित तब्बल 9 जणांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत.
त्यापैकी पोलिसांनी काल 7 जणांना अटक केली. शेतीच्या मालकीवरुन दोन कुटुंबात वाद झाला आहे. काल सुध्दा ज्यावेळी वाद झाला, त्यावेळी दोन्हीकडून संघर्ष झाल्यामुळे वाद विकोपाला गेला. त्यावेळी संशयित आरोपीनी दोघांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर शस्त्राने त्यांच्या शरिरावर वार केले. त्यामध्ये मोहम्मद खा शेख तुराबखा आणि शेख कासम शेख जान मोहमद या दोघांना मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.