बेपत्ता तरुणाचा शोध लागला, त्यानंतर संपूर्ण परिसर हादरला, पोलिस म्हणाले…
पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर तातडीने तो शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बुलढाणा : घराशेजारील अल्पवयीन मुलीला (minor girl) पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या नायगाव (naigaon) येथील तरुणाचा नायगाव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपाच्या टाकीत मृतदेह (deadbody) आढळून आल्याने या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. नांदुरा पोलिसांनी (nandura police) या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हा घातपात की आहे की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरील सगळ्या संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर मृतदेह सुध्दा ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदनासाठी मुलाचा मृतदेह देण्यात आला आहे.
मृतदेह अवैध बायोडिझेल पंपाच्या जमिनीत असलेल्या टाकीत
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील नायगाव येथील 40 वर्षीय महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीला वेदांत कैलास सपकाळ याने पळवून नेल्याची तक्रार 16 फेब्रुवारी रोजी नांदुरा पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी वेदांत याच्याविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर काही तासांतच आरोपी वेदांत सपकाळ याचा मृतदेह अवैध बायोडिझेल पंपाच्या जमिनीत असलेल्या टाकीत आढळून आला. वेदांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सध्या तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक तपास नांदुरा पोलीस करत आहेत.
त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची अधिक गर्दी…
मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिस तिथं पोहचल्यानंतर तो मृतदेह वेदांत कैलास सपकाळ याचा असल्याचा पोलिसांना खात्री पटली. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली, त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची अधिक गर्दी झाली होती.



पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर तातडीने तो शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.