Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime news : राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी घसरली, अपघात पाहणाऱ्यांनी डोळे झाकले, मग…

काल एकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात लोकांनी हळहळ व्यक्त केली. रस्त्याचं काम सुरु होतं, त्याच ठिकाणी मोटारसायकल घसरली. झालेल्या मृत्यूला कंत्राट घेतलेली कंपनी जबाबदार असल्याची सुद्धा लोकं चर्चा करीत होती.

Crime news : राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी घसरली, अपघात पाहणाऱ्यांनी डोळे झाकले, मग...
Buldhana bike accidentImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 7:57 AM

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सातत्याने अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांचे मृत्यू देखील झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर (malkapur) तालुक्यात चिखली रनथम (chikhali rantham) येथे दुचाकी घसरून दोन जण गंभीररित्या जखमी झाले होते. रुग्णालयात उपचारासाठी नेताना एकाचा वाटेतच मृत्यू झाला तर दुसऱ्या गंभीर जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा मृत्यू मार्ग बनत चालला असल्याची चर्चा सुरु आहे. मुंबई नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र काम सुरू असताना या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी सुरक्षित पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची आहे. मात्र असे असताना सुद्धा ठिकठिकाणी फलक न लावणे, रस्त्यावर थेट वाहतुकीसाठी स्लोप नसणे, यासह विविध कारणे या अपघातांचे कारण ठरत आहे.

त्यामुळे अपघात होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावरती काम सुरु आहे. त्यामुळे तिथल्या परिसरात अपघात सुरु आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत अनेकांचे बळी सुद्धा गेले आहेत अशी माहिती तिथले स्थानिक देत आहेत. रस्त्याचं काम जी कंपनी करीत आहे, त्याचं कंपनीने लोकांना पर्यायी रस्ता देणं गरजेचं असताना सुद्धा पर्यायी रस्ता अजून दिलेला नाही. त्यामुळे अपघात होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

हे सुद्धा वाचा

परिसरात लोकांनी हळहळ व्यक्त केली

काल एकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात लोकांनी हळहळ व्यक्त केली. रस्त्याचं काम सुरु होतं, त्याच ठिकाणी मोटारसायकल घसरली. झालेल्या मृत्यूला कंत्राट घेतलेली कंपनी जबाबदार असल्याची सुद्धा लोकं चर्चा करीत होती.  तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.