CRIME NEWS : शॉर्टसर्किटमुळे रात्री झोपडीला आग लागली, दिवसा संपुर्ण गाव हळहळलं, लोक म्हणतात…
बुलढाणा जिल्ह्यात ही घटना वाऱ्यासारखी पसरल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्या संपता संपत नाहीत. प्रत्येकवेळी नव्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे शेतकऱ्यांची चर्चा आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा : जिल्ह्यात (BULDHANA CRIME NEWS) एक दुर्देवी घटना घडली आहे, त्यामुळे संपुर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्याची (FARMER) झोपडी जळून खाक झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचा सुध्दा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी (BULDHANA POLICE) मृतदेह ताब्यात घेतला असून आरोग्य तपासणी केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सांगितली आहे. विशेष म्हणजे पहाटेच्या सुमारात शेतात गेलेल्या शेतकऱ्यांनी ही घटना पाहिल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना आणि पोलिसांना याची माहिती दिली.
शेतामध्ये कोणी नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही
बुलढाणा जिल्ह्यातील दुधलगाव येथील शेतातील झोपडीत शेतकरी झोपलेला असतांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 34 वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना दुधलगाव येथे घडली आहे. मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील गणेश विजय नारखेडे वय 34 वर्षे हा शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात झोपलेला असताना रात्रीच्या सुमारास अचानकपणे मोटरच्या शॉर्टसर्किटमुळे झोपडीला आग लागली. शेतकऱ्याने या आगीतून सुटका करून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण टीनाच्या खोलीला करंट असल्यामुळे त्याचा हात लोखंडी पाइपला लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. शेतामध्ये कोणी नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही, त्यामुळे करंट लागून पडलेला तो शेतकरी जळून खाक झाला होता. ही घटना शेतात जाताना इतर शेतकऱ्यांच्या शेतात लक्षात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात ही घटना वाऱ्यासारखी पसरल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्या संपता संपत नाहीत. प्रत्येकवेळी नव्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे शेतकऱ्यांची चर्चा आहे. घटना स्थळाची पोलिस चौकशी करणार असून आग कशामुळे लागली त्यावेळी हे कारण सुद्धा स्पष्ट होईल.
महाराष्ट्रात वीजेचा धक्का लागून आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेकवेळा वीज पुरणाऱ्या कंपनीच्या चुकीमुळे असे अपघात घडले आहेत.