भयानक ! फटाके फोडत टोळक्याचा हैदोस, अल्पवयीन मुलीला छेडलं ; आईने विरोध दर्शवल्यावर थेट घरात घुसून..

फटाके फोडणाऱ्या काही तरूणांच्या टोळक्याने हैदोस घातला. त्यांनी फटाके फोडतानाच एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. आणि त्यानंतर थेट घरात घुसून..

भयानक ! फटाके फोडत टोळक्याचा हैदोस, अल्पवयीन मुलीला छेडलं ; आईने विरोध दर्शवल्यावर थेट घरात  घुसून..
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 10:54 AM

गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 14 नोव्हेंबर 2023 : सध्या सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. दिवळीनिमित्त अनेक ठिकाणी सजावट, रांगोळ्या काढल्या आहेत. फटाकेही फोडले जातात. पण बुलढाण्यात दिवाळीच्या या सणाला गालबोट लागलं.  मेहकर येथे फटाके फोडणाऱ्या काही तरूणांच्या टोळक्याने हैदोस घातला. त्यांनी फटाके फोडतानाच एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. मात्र तिच्या आईने त्यांना हटकले आणि निघून जाण्यास सांगितले.

मात्र यामुळे ते तरूण संतापले आणि ते थेट त्या मुलीच्या घरात घुसले. त्यांनी घरात घुसून हल्ला केला, तसेच घरातील सामानाची तोडफोड करत नासधूसही केली. एवढेच नव्हे तर झटापटीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रही आरोपींनी लुटले.यात दोन जण जखमीही झाले. याप्रकरणी पीडित महिलेच्या क्रारीवरून पोलिसांनी ३१ जणांविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

आनंदाला लागलं गालबोट

मिळालेल्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबर रोजी, रविवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच ही घटना घडली. मेहकर शहरातील मोळा रोड परिसरातील एका कुटुंबीयांच्या घरात घुसून 30 ते 35 जणांच्या टोळक्यान हैदोस घातला. पीडित महिला आणि तिची मुलगी लक्ष्मीपूजनासाठी इतर महिलांसोबत गल्लीतील मंदिराच्या दिशेने निघाल्या होत्या. दरम्यान, वाटेतच काही युवकांचे टोळके हातात लाठ्याकाठ्या घेऊन धुडगूस घालत होते. त्याचवेळी एका पंधरा वर्षीय मुलीच्या समोर फटाके फोडण्यात आले. त्या तरूणांनी त्या मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करत तिची छेडही काढली. तेव्हा तिच्या आईने त्या तरूणांना ओरडत चांगलीच समज दिली.

मात्र संतापलेले तरूण थेट त्या महिलेच्या घरातच घुसले आणि रागाच्या भरात तोडफोड करू लागले. याचदरम्यान झटापटीत त्या हल्लेखोरांनी पीडित महिलेच्या गळ्यातील एक तोळे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले. पीडित महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून तिचा मुलगा आणि मित्र मदतीसाठी धावत आले खरे पण हल्लेखोरांनी त्यांनाही जुमानले नाही. उलट त्यांच्यावर हल्ला करून, मारहाण केली. ते दोघेही त्यात गंभीर जखमी झाले.

यानंतर पीडित महिलेने ताडीने पोलिस ठाण्यात धाव घेत तेथील अधिकाऱ्यांसमोर सर्व प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी 30 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता..

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.