Buldhana Crime : मलकापूर बस स्थानकात गाव गुंडांचा राडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रक्षाबंधनासाठी पत्नी माहेरी चालली होती. पती बस स्थानकात सोडायला गेला होता. मात्र बसस्थानकात जे घडलं त्याने एकच खळबळ उडाली.

Buldhana Crime : मलकापूर बस स्थानकात गाव गुंडांचा राडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
गावगुंडांचा बस स्थानकात राडाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 7:36 AM

बुलढाणा / 29 ऑगस्ट 2023 : बुलढाण्यात गावगुंडांच्या मारहाणीच्या घटनाही वाढत आहेत. रक्षाबंधनासाठी पत्नी आणि मुलीला बस स्थानकात सोडायला आलेल्या पतीला गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना मलकापूर बस स्थानकात घडली आहे. मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

काय घडलं नेमकं?

फिर्यादी प्रशांत बोरुले यांची पत्नी रक्षाबंधनासाठी माहेरी चालली होती. पती पत्नी आणि मुलीला मलकापूर बस स्थानकात सोडायला आला होता. बसची वाट पाहत बसली असताना महिला आपल्या मुलीचे मोबाईलमध्ये फोटो काढत होता. आरोपींपैकी एक जण तेथे आला अन् महिलेकडे मोबाईल पहायला मागू लागला. यावेळी महिलेचा पती तेथे आला आणि त्याने मोबाईल दाखवण्यास नकार दिला.

मोबाईल न दाखवल्यामुळे आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. यानंतर आरोपींच्या अन्य साथीदारांनीही फिर्यादीला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी महिलेच्या हातातील मोबाईलही तोडला. बसस्थानकात उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये मारहाणीचा व्हिडिओ कैद केला.

हे सुद्धा वाचा

ते मारहाण करत होते अन् लोकं व्हिडिओ बनवत होते

गावगुंड मारहाण करत होते आणि लोकं बघ्याची भूमिका घेत होते. कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. फिर्यादीची पत्नी मध्ये पडली असता आरोपींनी तिलाही ढकलून दिले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेनंतर प्रशांत बोरुले यांनी मलकापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. बोरुले यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.