दहा दिवसांपूर्वी अटक, बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
बुलडाण्यात चोरीच्या गुन्ह्यात बालसुधारगृहात असलेल्या 2 अल्पवयीन मुलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
बुलडाणा : बुलडाण्यात चोरीच्या गुन्ह्यात बालसुधारगृहात असलेल्या 2 अल्पवयीन मुलांनी गळफास घेत आत्महत्या (Minor Died By Suicide In Juvenile Detention Center) केल्याची घटना घडली आहे. बुलडाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृह/बालसुधार गृह आहे. येथे दोन अल्पवयीन गुन्हेगारांनी शनिवारी (6 डिसेंबर) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली (Minor Died By Suicide In Juvenile Detention Center).
या अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येचा घटनाक्रम खोलीतील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या शेगांव येथे 10 दिवसांपूर्वी चोरी केलेल्याच्या गुन्ह्याखाली या दोन अल्पवयीन आरोपींना पकडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बुलडाणा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. या दरम्यान, एक अल्पवयीनने दोनवेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पुन्हा-पुन्हा त्याला पकडून बालसुधारगृहात आणलं होतं.
हे अल्पवयीन मुलं ज्या खोलीत राहत होते, त्या खोलीत त्यांच्याव्यतिरिक्त आणखी एक जण राहत होता. मात्र. तो आरोपी झोपेत असताना या दोघांनी टॉवेल आणि बेडशीटला लटकून आपलं जीवन संपवलं. शनिवारी पहाटे 4 वाजता आत्महत्या केली.
सकाळी जेव्हा तिसऱ्या झोपलेल्या बालगुन्हेगाराने हा प्रकार पहिला, तेव्हा त्याने आरडाओरड केली आणि सर्व कर्मचारी जमा झाले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या दोघांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळhttps://t.co/3oSjc0xXwU#death #deathofchild #crime #crimesnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
Minor Died By Suicide In Juvenile Detention Center
संबंधित बातम्या :
चाळीसगाव गोळीबार प्रकरणात खळबळजनक खुलासा, तुरुंगातील कैद्याकडूनच हत्येची सुपारी
प्रेमात अडथळा ठरत असल्याने नवऱ्याचाच केला खून; दीर-भावजयीला बेड्या
रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी