Crime News : बाप लग्न करुन देईना, मुलाने घेतला निर्णय, धक्कादायक घटना पाहून परिसर हादरला

वयाची चाळीशी ओलांडली तरी बाप लग्नाचं नाव घेईना, मग मुलाने असा काही प्रताप केला की, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Crime News : बाप लग्न करुन देईना, मुलाने घेतला निर्णय, धक्कादायक घटना पाहून परिसर हादरला
BULDHANA CRIME NEWS TODAYImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 10:14 AM

गणेश सोळंकी, बुलढाणा : चाळीस वय झालंय तरी सुध्दा वडिल मुलाचं लग्न लावून देत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलाने रागाच्या भरात रखरखत्या उन्हात डोळ्यात मारली काठी, त्यामध्ये वडिलांचा (father dead) तडफडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी (buldhana police) दिली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगावात (jamod pipalgaon) घडली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथं असलेल्या कामगारांनी हे सगळं पाहिलं आहे. जामोद पोलिसांनी मुलास घटनास्थळावरुन अटक केली आहे. ही घटना घडल्यापासून याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. आरोपी वडिलांसोबत एका वीटभट्टीवर काम करीत होता.

मुलगा चाळीस वर्षाचा झाला तरी…

बाप आपल्या मुलाचे लग्न करून देत नाही, म्हणून मुलाने आपल्या बापाचाच खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथून जवळ असलेल्या अडोळ फाट्यावर ही घटना घडली आहे.आरोपी आपल्या वडिलांसोबत वीट भट्टीवर काम करत होता. यामध्ये मुलगा चाळीस वर्षाचा झाला तरी बाप लग्न करून देत नसल्याने मुलगा भानसिंग भैरड्या याने वडील नानसिंग भैरड्या याच्या डोक्यात काठी मारून त्याचा खून केला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आरोपी मुलास ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

वीट भट्टीचं काम सुरु असताना अचानक लग्नाचा विषय निघाला

महाराष्ट्रात आतापर्यंत अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक मुलांनी आपल्या वडिलांचा खून केला आहे. त्याचबरोबर त्यांना शिक्षा सुध्दा झाली. बुलढाण्यातली घटना थोडीसी वेगळी आहे. वीट भट्टीचं काम सुरु असताना अचानक लग्नाचा विषय निघाला. त्यावेळी संतप्त झालेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात काठी मारली आणि वडिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे, त्याचबरोबर त्याची सखोल चौकशी केल्यानंतर आणखी काही गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.