मुरैना (मध्य प्रदेश) : देशात चिघळत चाललेल्या भोंग्याच्या राजकारणानंतर बुलडोझर मॉडेलवर (Bulldozer model) रणकंदम माजले आहे. देशातील उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेले बुलडोझर मॉडेल मध्य प्रदेशातही वापरले जात आहे. याच्याआधी राज्यातील गुन्हेगारांवर सक्त कारवाई करण्यासाठी बुलडोझर मॉडेलचा आणखीन तिव्र वापर केला जाईल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. त्यानंतर आता योगींचा बुलडोझर मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) गुन्हेगारांच्या घरावर आता फिरताना दिसत आहे. मुरैना येथील देवगड पोलीस स्टेशन हद्दीतील खिटोरा गावात ६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. निरागस मुलगी वडिलांसाठी बिडीचे बंडल आणण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी दुकानदार रिंकू शर्मा याने निष्पाप मुलीला चॉकलेट आणि बिस्किटांचे आमिष दाखवले. यानंतर दुकानामागील खोलीत नेऊन बलात्कार (rape) केला. त्यानंतर तो फरार झाला. ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर बुलडोझर चालवून २४ तासांत त्याचे घर भू सपाट केले आहे. तर या निष्पाप मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवगड गावात राहणारी 6 वर्षीय मुलगी साडेआठच्या सुमारास वडिलांसाठी विडी घेण्यासाठी दुकानात गेली होती. दुकानदार रिंकू शर्मा (वय ३२) याने त्याला टॉफीचे आमिष दाखवून दुकानातील एका खोलीत नेले. येथे आरोपीने तिचे तोंड बंद करून बलात्काराचा गुन्हा केला. घटनेनंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन सोडून दिले. पीडित मुलगी कशीतरी रडत रडत घरी पोहोचली आणि तिने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. निष्पाप मुलाला घेऊन कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले. येथे पोलिसांनी निष्पाप मुलीचा जबाब नोंदवून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत एसडीएम जौरा यांच्या उपस्थितीत आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून तोडफोड केली. त्याचवेळी पोलीस आरोपीच्या शोधात छापेमारी करत आहेत. देवगड पोलिस स्टेशनचे प्रभारी सुखदेव सिंह चौहान यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी आरोपीने 6 वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एसडीएमच्या उपस्थितीत बुलडोझर चालवून त्याचे घर फोडण्याची कारवाई करण्यात आली आहे.