Dombivali Bike Fire : भररस्त्यात बाईकला भीषण आग, डोंबिवलीत वाहतूक खोळंबली; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली गाव 8 नंबर नाका मंजुनाथ शाळेजवळ आज दुपारी साडेबाराच्या सुमारास एका बुलेट गाडीला अचानक आग लागली. भररस्त्यात घडलेल्या घटनेने नागरिकांची इकडे तिकडे पळापळ झाली.
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील मंजुनाथ शाळेजवळ भररस्त्यात एका मोटरबाईक (Bike)ला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. आगीमुळे परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक (Traffic) काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच केडीएमसीचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाने त्वरित आग विझवली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली आहे. मंगेश वेलणकर यांच्या धाब्यावरील व्यक्तीची ही बाईक होती. पेट्रोल भरु जात असताना मध्येच गाडीला अचानक आग लागली आणि बुलेट जळून खाक झाली.
अग्नीशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं
डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली गाव 8 नंबर नाका मंजुनाथ शाळेजवळ आज दुपारी साडेबाराच्या सुमारास एका बुलेट गाडीला अचानक आग लागली. भररस्त्यात घडलेल्या घटनेने नागरिकांची इकडे तिकडे पळापळ झाली. वाहलचालकांनीही काही वेळ आपली वाहने थांबविली होती. परिसरातील काही नागरिकांनी शेजारच्या दुकानातून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग अधिकच भडकल्याने याची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार ही गाडी मंगेश वेलणकर धाब्यावरील व्यक्तीची आहे. मानपाडा परिसरातून पेट्रोल भरून या मार्गावरून जात असताना गाडीने अचानक पेट घेतल्याने दुचाकीस्वाराने तात्काळ बुलेट रस्त्याच्या बाजूला उभी केली. (Bullets caught fire on road in Dombivali, bike burnt)