दिवसा प्रेयसी भिकारी बनून रेकी करायची, रात्री प्रियकर दुचाकी चोरायचा

नागपूरमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या बंटी बबलीला पकडण्यात जरीपटका पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून तीन मोपेड गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दिवसा प्रेयसी भिकारी बनून रेकी करायची, रात्री प्रियकर दुचाकी चोरायचा
दुचाकी चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 2:47 PM

नागपूर / गजानन उमाटे : नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या बंटी बबलीला बेड्या ठोकण्यात जरीपटका पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून तीन मोपेड गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ऋषी ऊर्फ लकी असे अटक चोरट्याचे नाव आहे. या गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा समावेश असून, जरीपटका पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेले बंटी बबली प्रियकर प्रेयसी आहेत. आरोपींची मोडस ऑपरेंडी पाहून तुम्हीही चक्रावून जाल. पोलीस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत.

प्रेयसी रेकी करायची, प्रियकर रात्री दुचाकी चोरायचा

प्रेयसी दिवसा भिकारी बनवून रेकी करायची, मग प्रियकर रात्री दुचाकी चोरायचा. ही महिला घटस्फोटीत असून, आरोपी ऋषीसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. मग या बंटी बबलीने परिसरातील दुचाकींवर आपले लक्ष वळवले. परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. जरीपटका पोलीस गुन्ह्याचा तपास करत असताना या बंटी बबलीचा सुगावा लागला.

पोलिसांनी तात्काळ या बंटी बबलीचा शोध घेत त्यांना अटक केली. ऋषी हा सराईत गुन्हेगार आहे. या आरोपींनी आतापर्यंत किती दुचाक्या चोरल्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

जळगावात अट्टक दुचाकी चोर अटकेत

रावेर तालुक्यातील सावदा चोरीच्या तब्बल 12 दुचाकींसह अट्टल चोरट्यांना सावदा पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. जावेद मुबारक तडवी आणि मुनाफ मुबारक तडवी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नाकाबंदीदरम्यान संशयित जाळ्यात अडकले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.