गोळीचा आवाज आला अन् कर्मचारी आत गेले, हसतमुख मालक… काय घडलं त्या ऑफिसात?

मुंबईत सतत काही ना काही घडत असतं. गुन्हे तर रोजच घडत असतात. काल झालेल्या एका घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका व्यापाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं आहे. आपल्या कार्यालयातच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. सतत हसतमुख आणि प्रेमळ स्वभावाच्या या व्यक्तीने स्वत:ला अचानक संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गोळीचा आवाज आला अन् कर्मचारी आत गेले, हसतमुख मालक... काय घडलं त्या ऑफिसात?
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 12:13 PM

अत्यंत गजबजलेल्या असलेल्या मुंबईच्या भेंडीबाजारात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भेंडीबाजारात एका व्यापाऱ्याने स्वत:वर गोळी घालून जीवन संपवलं आहे. हसमुख असलेल्या या व्यापाऱ्याने अचानक स्वत:ला संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा त्याच्या कार्यालयात त्याचे कर्मचारी होते. गोळीचा आवाज ऐकताच सर्व धावतच आत गेले. पण त्यावेळी त्यांचा मालक रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

भेंडीबाजारात काल शुक्रवारी रात्री 8.30च्या सुमारास ही घटना घडली. इक्बाल मोहम्मद सिवानी असं या 52 वर्षीय व्यापाऱ्याचं नाव आहे. भेंडी बाजारातील अमीन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर त्यांचं कार्यालय आहे. त्यांनी कार्यालयातच स्वत:वर गोळी घातली. त्यावेळी कार्यालयातील कर्मचारीही तिथेच होते. गोळीचा आवाज येताच ते आतमध्ये धावत गेले. तेव्हा सिवानी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

म्हणून आयुष्य संपवलं

इक्बाल मोहम्मद हे कर्जाच्या विळख्यात सापडलेले होते. व्यवसायात सतत तोटा होत असल्याने ते तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. सिवानी यांच्या आत्महत्येमागे दुसरा कोणता अँगल तर नाही ना? याचाही तपास पोलीस करत आहेत.

पिस्तुल जप्त

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसेच ज्या पिस्तुलमधून गोळी झाडण्यात आली होती, ती जप्त केली आहे. पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

गेल्या महिन्यातच एकाने संपवलं

गेल्या महिन्यातही एका श्रीनिवासन नावाच्या व्यक्तीने जीवन संपवलं होतं. श्रीनिवासन बऱ्याच काळापासून विदेशात नोकरी करत होते. नंतर त्यांनी मुंबईत व्यवसाय सुरू केला होता. पण सातत्याने नुकसान होत असल्याने कर्जाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवलं होतं. त्यांनी अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून जगाचा निरोप घेतला होता.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.