चॉकलेटच्या रॅपरमधून गांजाची तस्करी, आरोपींची ‘टॅलेंटगिरी’ ‘चतूर’ पोलिसांनी उघडी पाडली

चॉकलेटच्या रॅपरमधून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला बुलडाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून तब्बल 40 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. तसंच आरोपीवर विविध कलमांतर्गंत गुन्हा दाखल केलाय.

चॉकलेटच्या रॅपरमधून गांजाची तस्करी, आरोपींची 'टॅलेंटगिरी' 'चतूर' पोलिसांनी उघडी पाडली
cannabis hemp smuggling
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 10:36 AM

बुलडाणा : चॉकलेटच्या रॅपरमधून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला बुलडाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून तब्बल 40 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. तसंच आरोपीवर विविध कलमांतर्गंत गुन्हा दाखल केलाय.

चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिरासमोरील प्रवासी निवाऱ्यात ही कारवाई करण्यात आलीय. आरोपीकडून एकूण 40 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत एकूण 2 लाख 75 हजार 400 रुपये इतकी आहे. आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.

चॉकलेटच्या रॅपरमध्ये गांजाची पाकिटे

गांजा तस्करी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवत चॉकलेटच्या रॅपरमध्ये गांजाची पाकिटे तयार करून तस्करी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या गुजरात राज्यात राहणाऱ्या एका आरोपीला बुलडाणा पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बारकु शंकर पटेल असे आरोपीचे नाव असून बुलडाणा पोलिसांनी चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिरासमोरील प्रवासी निवाऱ्यात ही कारवाई करण्यात केलीय.

पोलिसांनी विचारपूस करताच आरोपीने पळ काढला

रात्रीच्यावेळी चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिरासमोरील प्रवासी निवाऱ्यात बॅग घेवून संशयास्पद उभा असलेला एक व्यक्ती दिसून आला. यावेळी त्याला विचारपूस करून बॅगेची झाडाझडती करीत असताना या इसमाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळी बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये चॉकलेटच्या रॅपरमध्ये दोन किलोचे एक पाकिट अशी एकूण 20 पाकिटे आढळून आली. या गांजाची किंमत अंदाजे 7 हजार प्रतिकिलो याप्रमाणे एकूण 2 लाख 75 हजार 400 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय.

आरोपी लक्झरी बसने हा गांजा मुंबई येथे नेत असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गांजा तस्करीप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलिस करत आहेत.

यवतमाळमध्ये 1 क्विंटल गांजा जप्त, 5 वर्षातील सर्वात मोठी कारवाई

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील झोंबाडी (बाळेगाव) येथे 17 ऑगस्ट मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला. यातील एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. नेर तालुक्यात एवढ्या मोठ्या स्तरावर गांजाच्या तस्करी केली जात असल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. पथकाने दिलेल्या माहीतीनुसार ही जिल्ह्यातील 5 वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे.

कुख्यात गांजा तस्कर महिला येत असल्याची मिळाली माहिती

नेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. या गांजातस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली होती. याच गांजातस्करीबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहीतीनुसार सुलतानपूर येथील कुख्यात गांजातस्कर महिला गांजा देण्यासाठी झोंबाळी येथे येत असल्याचे पोलिसांना समजले.

एकूण 12 पोत्यांत गांजा भरला

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरक्षक प्रदीप परदेशी व सहाय्यक पोलीस निरक्षक विवेक देशमुख यांनी कारवाई केली. त्यानंतर एलसीबी पथकाने काल रात्री 10 वाजता एक ईनोव्हा घरासमोर पकडली. यावेळी गांजातस्कर महिलेही बेड्या ठोकण्यात आल्या. पथकाने इनोव्हा कार व घराची झडती घेतली असता तब्बल 1 क्विंटल 90 किलो गांजा पकडला केला. हा गांजा एकूण 12 पोत्यांत भरण्यात आला होता. पकडण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत 22 लाख 50 हजार आहे. तर जप्त करण्यात आलेल्या ईनोव्हाची किंमत 9 लाख रूपये आहे.

(Cannabis hemp smuggling from chocolate wrapper, police Arrested Accussed)

हे ही वाचा :

27 गुन्हे नावावर असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या अहमदनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Sachin Vaze : सचिन वाझेने अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली? सर्वात मोठं कारण समोर

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.