Pune-Mumbai Expressway : थांबलेल्या ट्रकमध्ये मागून घुसली कार, अपघातामध्ये चौघांचा मृत्यू

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) गहुंजे गावात शनिवारी दुपारी ट्रकचा आणि कारचा भीषण अपघात झाला. थांबलेल्या ट्रकला कारने दिली, धडकेत चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. शिवम राहुल कोकाटे, प्रियम सत्येंद्र राठी, हृषीकेश मनोज शिंदे आणि मोहनीश संगम विश्वकर्मा अशी मृतांची नावे शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police) सांगितली आहेत

Pune-Mumbai Expressway : थांबलेल्या ट्रकमध्ये मागून घुसली कार, अपघातामध्ये चौघांचा मृत्यू
थांबलेल्या ट्रकमध्ये मागून घुसली कारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 11:27 AM

पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) गहुंजे गावात शनिवारी दुपारी ट्रकचा आणि कारचा भीषण अपघात झाला. थांबलेल्या ट्रकला कारने दिली, धडकेत चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. शिवम राहुल कोकाटे, प्रियम सत्येंद्र राठी, हृषीकेश मनोज शिंदे आणि मोहनीश संगम विश्वकर्मा अशी मृतांची नावे शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police) सांगितली आहेत. भरधाव वेगाने निघालेल्या कारने ट्रकला मागच्या बाजूने जोराची धडक दिली. तसेच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला असल्याचे शिरगाव पोलीस चौकीतील उपनिरीक्षक बळवंत गावित (Sub-inspector Balwant Gavit) यांनी सांगितले.

मृत विद्यार्थ्यांच्या घरच्यांना सहलीची कल्पना नव्हती

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पालक किंवा अन्य नातेवाईक त्यांच्या सहलीच्या प्लॅनबाबत अजिबात माहित नव्हते. शिरगाव पोलीस चौकीतील उपनिरीक्षक बळवंत गावित यांनी सांगितले की, आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी बोललो आणि ते कुठे आणि कोणत्या कारणासाठी जात आहेत. याची माहिती त्यांच्या पालकांना किंवा इतर नातेवाईकांना मृत विद्यार्थ्यांनी दिली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संशयास्पद आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर अधिक माहिती बाहेर येईल असंही त्यांनी सांगितलं.

थांबलेल्या ट्रकला कारने धडक दिली

शिवम राहुल कोकाटे (१९) सदाशिव पेठ, प्रियम सत्येंद्र राठी (२०) नारायण पेठ, हृषिकेश मनोज शिंदे (२१) रा. बिबवेवाडी आणि मोहनीश संगम विश्वकर्मा (२०) धनकवडी हे चार विद्यार्थी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. दुपारी 3.30 च्या सुमारास द्रुतगती मार्गावरील गहुंजे गावात थांबलेल्या ट्रकला कारने धडक दिली. या अपघातात या सर्वांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हृषिकेश मनोज शिंदे, ज्यांच्या वडिलांची कार आहे, शिंदे ती चालवत होता. तो सगळे टिळक रोडवरील महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे. तर इतर तिघे डेक्कनमधील कर्वे रोडवरील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

गाडीवरील नियत्रंण सुटल्याने अपघात झाला

अपघात झालेला ट्रक पुण्याहून मुंबईकडे जात होता. त्यात तांत्रिक बिघाड झाला. ट्रक चालकाने वाहन सर्व्हिस लेनच्या अगदी टोकाला खेचले आणि तिथे थांबवले होते. ट्रक थांबवताना त्याने पुरेशी खबरदारी घेतली होती. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे हा अपघात झाला आहे. त्यानंतर ती सर्व्हिस लेनमध्ये जाऊन थांबलेल्या ट्रकवर आदळली आहे.

MNS: शिवाजी पार्क पोलीस स्टेशनखालीच मनसेचा हनुमान चालिसा, भोगें जप्त केल्याने मनसे आक्रमक; सेना भवन मशीद आहे का?

धुळ्यात एमबीबीएसच्या 100 वाढीव जागांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले

महाराष्ट्रातील कलाकारांमध्ये रंगणार क्रिकेट मॅच,’एमबीसीसीएल’च्या लोगोचे अनावरण

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.