सांगलीत नामांकीत उषःकाल हॉस्पिटलकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी? 3 जणांवर गुन्हा दाखल

सांगली शहरातील उषःकाल हॉस्पिटल प्रशासनाकडे 25 लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगलीतील शाह कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णालयातून परस्पर रुग्णही पळविल्याची तक्रार करण्यात आली आहे.

सांगलीत नामांकीत  उषःकाल हॉस्पिटलकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी? 3 जणांवर गुन्हा दाखल
सांगलीत नामांकीत उषःकाल हॉस्पिटलकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी?
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 8:00 PM

सांगली शहरातील नामांकित अशा उषःकाल हॉस्पिटल प्रशासनाला 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या सांगलीतील शाहा कुटुंबियांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर रुग्णालयातून रुग्णही परस्पर पळविल्याची तक्रारही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये राहुल शाह, संपदा शाह आणि यश शाह यांचा समावेश आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सांगली पोलीस या प्रकरणी आता सखोल तपास करत आहेत. पण संबंधित प्रकार समोर आल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरु आहे.

राहुल शहा यांच्या मातोश्री शकुंतला शाह या उषःकाल रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांचे रुग्णालयाचे बिल 39,346 रुपये इतके झाले होते. यावेळी राहुल शाह यांनी आपल्या मातोश्री यांना बिल न भरताच रुग्णालयातून नेले. यानंतर शाह यांनीच पोलिसात रुग्णालयाबाबत तक्रार दिली. संबंधित तक्रार मागे घेण्यासाठी संशयितांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे 25 लाखांची खंडणी मागितली, असा आरोप करण्यात आलाय. तशी तक्रार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय कोगरेकर यांनी दिल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी राहुल शाह याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय कोगरेकर यांनी सांगितले.

संबंधित प्रकरणी आता पोलीस तपासातून काय माहिती समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रुग्णालय प्रशासनाकडे खरंच 25 लाखांची खंडणी मागण्यात आली का? याचा तपास पोलीस करणार आहेत. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेले आरोप खरे आहेत का? याचा देखील तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.