Sanjay Pandey : माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून चौकशी, अडचणीत वाढ होण्याची शक्यता

आत्तापर्यंत एजन्सीने 25 डेस्कटॉप, दोन लॅपटॉप, मोबाईल फोन, कथितपणे बेकायदेशीर फोन टॅपिंगशी जोडलेले अनेक दोषी दस्तऐवज जप्त केले असल्याची माहिती मिळाली आहे.

Sanjay Pandey : माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून चौकशी, अडचणीत वाढ होण्याची शक्यता
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 12:41 PM

मुंबई – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) हे निवृत्त झाल्यापासून त्यांच्या पाठीमागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. जून महिन्याच्या 30 तारखेला ते निवृत्त झाले आहेत. ते मुंबईचे पोलिस आयुक्त (Mumbai) असताना महाविकास आघाडी आणि भाजपचा ज्यावेळी संघर्ष झाला. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं. आता महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं आहे. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांना तिसऱ्या दिवशी ईडीची (ED) नोटीस आली होती. त्यांनी फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांची आज सीबीआयच्या (CBI)अधिकाऱ्यांनी चौकशी केली असल्याची माहिती समजली आहे. संजय पांडे यांच्यावरती मागच्या आठ वर्षापासून फोन रेकॉर्ड करीत असल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे.

सीबीआयच्या टीमने घेतली पांडे यांच्या घराची झडती

आत्तापर्यंत एजन्सीने 25 डेस्कटॉप, दोन लॅपटॉप, मोबाईल फोन, कथितपणे बेकायदेशीर फोन टॅपिंगशी जोडलेले अनेक दोषी दस्तऐवज जप्त केले असल्याची माहिती मिळाली आहे.  2018 च्या सुरुवातीस एनएसईने माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या इतर काही प्रकरणांमध्ये चौकशी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे सगळं थांबवण्यात आले आहे. सीबीआय अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी संजय पांडे यांच्या अंधेरी येथील चार बंगला निवासस्थानी छापा मारला. सकाळी नऊच्या सुमारास टीम त्यांच्या पहिल्या मजल्यावरील निवासस्थानी पोहोचली. त्यावेळी सीबीआयच्या टीमने त्यांच्या घराची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. त्यावेळी संजय पांडे यांची वृद्ध आई फक्त घरी होती.

संजय पांडे यांच्यासह अनेकांवरती गुन्हा दाखल

सीबीआयने संजय पांडे, चित्रा रामकृष्ण आणि एनएसईचे माजी संचालक रवी नारायण यांच्या विरुद्ध 2009 ते 2017 दरम्यान एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जे कॉल रेकॉर्ड करण्यात आले. त्यावेळी कसल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. या प्रकरणी संतोष पांडे, आनंद नारायण, अरमान पांडे, मनीष मित्तल, माजी वरिष्ठ माहिती सुरक्षा विश्लेषक नमन चतुर्वेदी आणि अरुण कुमार सिंग यांच्यासह माजी संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.