Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राबडी देवी यांच्या घरी सीबीआयचा छापा, रेल्वे खात्यातील भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई

रेल्वे खात्यातील घोटाळा प्रकरणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. यामुळे लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राबडी देवी यांच्या घरी सीबीआयचा छापा, रेल्वे खात्यातील भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई
राबडी देवीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 11:50 AM

नवी दिल्ली / संदीप राजगोळकर : बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठे प्रस्थ असलेले लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजदचे नेते लालूप्रसाद यांच्या पत्नी तथा बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआयच्या पथकाने छापेमारी केली आहे. लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी गेले होते, त्याचदरम्यान सीबीआयचे पथक राबडी देवी यांच्या घरी धडकले. जमिनीच्या बदल्यात रेल्वे खात्यात नोकरी दिल्याच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केल्याचे समजते.

रेल्वे खात्यातील घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांच्या अडचणीत वाढ

रेल्वे खात्यातील घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज सीबीआयने मोठी कारवाई करत पाटणा येथील राबडी देवी यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. या केंद्रीय तपास यंत्रणेने अलीकडेच लालूप्रसाद, राबडी देवी, मिसा भारती यांच्यासह 14 जणांना समन्स पाठवले आहे.

त्यानुसार या तिघांना येत्या 15 मार्चला सीबीआयपुढे हजर राहावे लागणार आहे. 14 वर्षे जुन्या प्रकरणात लालूयादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जमिनीच्या बदल्यात 7 जणांना रेल्वेत नोकरी देऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यापैकी 2 भूखंड लालूंना भेट म्हणून देण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

राबडी देवी यांच्या घरातील कागदपत्रे आणि मोबाईल ताब्यात

लालूप्रसाद यादव अलीकडेच सिंगापूरमधून किडनी प्रत्यारोपण करून मायदेशी परतले आहेत. याचदरम्यान सोमवारी सीबीआयची तीन पथके राबडी देवी यांच्या घरी दाखल झाली आणि छापेमारी सुरु करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांकडून राबडी देवी यांच्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली जात आहे.

कथित घोटाळा प्रकरणात सीबीआयने आरोपपत्रही दाखल केले आहे. त्यात लालूप्रसाद यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार भोला यादव, हृदयानंद चौधरी यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. भोला यादव यांना सीबीआयने 27 जुलै रोजी अटक केली होती. भोला हे 2004 ते 2009 या कालावधीत तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यांचे ओएसडी होते. या प्रकरणात अनेक जण चौकशीच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.