Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरचौकात भाईचा वाढदिवस साजरा, तलवारीने कापला केक, कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस विविध उपाययोजना राबवत आहेत. तर दुसरीकडे गुन्हेगारही आपली दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांच्या नाकात दम आणत आहेत.

भरचौकात भाईचा वाढदिवस साजरा, तलवारीने कापला केक, कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा
डोंबिवलीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजराImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 11:33 AM

डोंबिवली : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एकीकडे पोलीस विविध मोहिमा राबवत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सिगागेट ओढण्यावरही बंदी असताना दुसरीकडे मात्र गुन्हेगार आपली दहशत पसरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. टिळकनगर कचोरे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर भररस्त्यात तलवारीने केक कापून भाईचा वाढदिवस साजरा केला जात असल्याची घटना काल रात्री डोंबविलीतील श्रीराम चौक 90 फूट रोडवर घडली. यावरुन पोलिसांनी कितीही मोहिमा राबवल्या तरी गुन्हेगारांना पोलिसांचा आणि कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे दिसून येत आहेत. पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डोंबवलीत भाईगिरी आणि दहशत माजवण्याचा गुन्हेगारांचा प्रयत्न

सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये आता भाई लोकांचा कहर वाढत चालला आहे. आपली भाईगिरी आणि आपली दहशत माजवण्यासाठी हे भाई लोक खुलेआम भररस्त्यात हत्यार घेऊन फिरत असल्याचं दिसून येत आहे. असाच एक प्रकार डोंबिवली 90 फूट रोड श्रीराम चौकात घडला आहे. या परिसरात राहणाऱ्या एका भाईने रात्री भररस्त्यात तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे.

वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

विशेष म्हणजे हा वाढदिवस ज्या ठिकाणी साजरा होत होता, तेथून हाकेच्या अंतरावर डोंबिवली टिळक नगर कचोरे पोलीस चौकी आहे. भाईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा एक केबल व्यवसायिकाचा मुलगा असून, परिसरामध्ये दहशत करण्यासाठी नेहमी अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलं. आता तरी या गुन्हेगारांना डोंबिवली पोलीस आळा घालणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.