केंद्रीय मंत्र्याच्या आईला चोरट्यांनी लुटलं, पोलिसांचा तपास सुरु

NASHIK CRIME NEWS : नाशिक जिल्ह्यात काल केंद्रीय मंत्र्याच्या आईला लुटलं असल्याची तक्रार पोलिस स्टेशनध्ये दाखल करण्यात आली आहे. चोरीच्या घटनेमुळे पोलिस सतर्क झाले अजून चोरट्यांना शोध घेत आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या आईला चोरट्यांनी लुटलं, पोलिसांचा तपास सुरु
nashik crime news in marathiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 9:33 AM

चैतन्य गायकवाड, नाशिक : केंद्रीय मंत्र्याच्या आईला लुटल्याची घटना काल नाशिकमध्ये (NASHIK CRIME NEWS) घडल्यानंतर चर्चेला उधान आलं आहे. ही घटना काल वाऱ्यासारखी व्हायरल झाली. नाशिकमध्ये काल सायंकाळपासून सगळीकडे हीचं चर्चा सुरु आहे. केंद्रीय मंत्र्याच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरीला गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये (POLICE STATION) दाखल झाली आहे. पोलिस आरोपीचा सीसीटिव्हीच्या आधारे शोध घेत आहेत. मंत्र्याच्या आईच्या गळ्यातील सोन चोरीला जात असेल, तर सामान्य माणसाचं काय ?अशी चर्चा कालपासून सुरु आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (BHARATI PAWAR) यांच्या मातोश्रीचे मंगळसुत्र चोरट्यांनी खेचून नेली.

नाशिक शहरात मागच्या काही दिवसांपासून महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोनसाखळी चोरट्यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या आईलाच लक्ष केल्यामुळे जोरदार चर्चा सुरु आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचले.

हे सुद्धा वाचा

ही घटना काल सायंकाळच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरटीओ रोडवर घडली. शांताबाई बागुल असं डॉ. भारती पवार यांच्या आईचं नाव आहे. त्या भाजीपाला घेऊन पायी जात होत्या, त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या संशयित चोरट्यांनी बागुल यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी खेचली. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे.

नाशिकमध्ये मागच्या काही दिवसात चोरीचं प्रमाण अधिक वाढलं आहे.पोलिस प्रशासनाला गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. रोज घटना घडत असल्यामुळे चोरट्यांना बंदोबस्त कसा करावा असा प्रश्न पोलिसांनी नक्की पडला असेल.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.