Suchana Seth | कफ सिरपच्या रिकाम्या बाटल्या, हॉटलमध्ये मुलाची हत्या… फूलप्रूफ प्लानिंग करूनच गोव्याला गेली सूचना ?

व्यात पोटच्या 4 वर्षांच्या लेकाची हत्या करणारी CEO सुचना सेठ हिच्याबाबत एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. पोलिसांचे पथक या प्रकरणाचा सातत्याने बारकाईने तपास करत आहे. जिथे हा गुन्हा घडला, त्या गोव्यातील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये पोलीस पोहोचले असता त्यांना कफ सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या सापडल्या.

Suchana Seth | कफ सिरपच्या रिकाम्या बाटल्या, हॉटलमध्ये मुलाची हत्या... फूलप्रूफ प्लानिंग करूनच गोव्याला गेली सूचना ?
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 2:05 PM

पणजी | 11 जानेवारी 2024 : गोव्यात पोटच्या 4 वर्षांच्या लेकाची हत्या करणारी CEO सुचना सेठ हिच्याबाबत एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. पोलिसांचे पथक या प्रकरणाचा सातत्याने बारकाईने तपास करत आहे. जिथे हा गुन्हा घडला, त्या गोव्यातील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये पोलीस पोहोचले असता त्यांना कफ सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या सापडल्या. त्यामुळे मुलाची हत्या करण्यापूर्वी सुचनाने त्याला मोठ्या प्रमाणात कफ सिरप पाजले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या त्या रिकाम्या बाटल्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

सूचना हिच्या मानसिक स्थितीचे आकलन करून हा भीषण गुन्हा करण्यामागे नेमका काय हेतू होता यासाठी मानसशास्त्रज्ञाची मदत घेतली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. बुधवारी मानसशास्त्रज्ञांनी सूचना सेठ हिची चौकशी केली.

दरम्यान सूचनाच्या मुलाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले असता उशी किंवा टॉवेलच्या सहाय्याने त्याची गळा दाबून हत्या झाली असावी, असे त्यात आढळून आले. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले.

हे सुद्धा वाचा

कफ सिरपच्या दोन बाटल्या

सूत्रांच्या माहितीनुसार, जिथे ही हत्या झाली त्या अपार्टमेंटमध्ये एक लहान आणि एक मोठी अशा कफ सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या आढळल्या. तसेच मृत्यू होताना, त्या मुलाने कोणतंही स्ट्रग्ल किंवा झटापट केलेली नसल्याचंही पोस्टमॉर्टम अहवालात आढळलं. त्यामुळे सूचना हिने त्याला पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात कफ सिरप दिलं असावं आणि त्या औषधाचा परिणाम झाल्यावरच तिने मुलाची गळा दाबून हत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सूचनाने आत्महत्येचाही केला प्रयत्न

मुलाला बरं नाहीये असं सांगत सूचना हिने त्यांच्याकडून कफ सिरपची छोटी बाटली मागवली होती, असं गोव्यातील त्या सर्व्हिस अपार्टमेंटमधील एका कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितलं. तिच्याकडे कफ सिरपची मोठी बाटली आधीच होती. सुनियोजित कट रचूनचही हत्या करण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितले. एवढंच नव्हे तर मुलाची हत्या केल्यानंतर सूचनाने तिच्या डाव्या हाताचे मनगटही धारदार शस्त्राने कापले. तिलाही आत्महत्या करायची होती. पण नंतर तिचा हेतू बदलला. त्यानंतर तिने मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्लान आखला आणि ती बाहेर पडली.

पण पोलिसांच्या चौकशीत सूचना हिने हत्येचा आरोप फेटाळला आहे. मुलगा आधीच मेला होता, असा दावा तिने केला. 8 जानेवारील मी सकाळी उठले तेव्हा मुलाचा आधीच मृत्यू झाला होता, पण तो कसा गेला हे माहीत नाही, असा दावा सूचनाने केला. पोलिस तिच्या या थिअरीशी सहमत नाहीयेत. ते याप्रकरणी आणखी तपास करत आहेत. सध्या सूचना ही ६ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. तसेच तिचा माजी पती व्यंकटरमण हाही इंडोनेशियाहून भारतात परतला असून पोलिसा त्याचीही चौकशी करणार आहेत.

अशी केली हत्या

39 वर्षीय सूचना सेठ या एका स्टार्टअपच्या संस्थापक आणि सीईओ असून ती मूळची बंगळुरू येथील आहे. ती पतीपासून विभक्त झाली होती. तिच्यासोबत तिचा चार वर्षांचा मुलगा रहात होता. एके दिवशी सूचना मुलासह गोव्याला आली आणि एका हॉटलेमध्ये थांबली. पण परत जाताना ती टॅक्सीत बसली तेव्हा तिच्यासोबत मुलगा नव्हता. तिच्याकडे फक्त एक ट्रॉली बॅग होती. सूचनाने गोव्यातील कँडोलिम हॉटेलमध्ये एक रूम ( ४०४) बूक केली होती. चेक इन करताना तिने बंगळुरूचा पत्ता दिला होता. मात्र बंगळुरूला परत जाताना ती टॅक्सीची वाट बघत होती. तुम्ही विमानाने गेलात तर स्वस्त पडेल असे हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिला सांगितलं पण ती टॅक्सीनेच जाण्याच्या निर्णयावर ठाम होती. अखेर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिच्यासाठी टॅक्सीची व्यवस्था केली.

रूममध्ये रक्ताचे डाग

सुचना सेठने चेकआऊट केल्यानंतर हॉटेलचे सफाई कर्मचारी साफसफाईसाठी खोलीत गेले. मात्र तेथील दृश्य पाहून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. कारण, त्या खोलीमध्ये रक्ताचे डाग होते. त्यांनी तत्काळ हॉटेलच्या मॅनेजरला या घटनेची माहिती दिली. त्याने लगेचच पोलिसांना याबद्दल कळवलं. या घटनेची माहिती मिळताचा पोलिस लगेच तिथे दाखल झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. हॉटेलमध्ये मुलासह आलेली सूचना परत निघाली, तेव्हा तिच्यासोबत तिचा मुलगा नव्हता, हे पोलिसांच्या लक्षात आले.

सूचना ही टॅक्सीने गेल्याचे हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. मात्र तिच्यासोबत तिचा मुलगा नव्हता, पण एक ट्रॉली बॅग नक्कीच होती. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची व्यवस्था केलेली असल्याने तिचा नंबरही उपलब्ध होता. इन्स्पेक्टर नाईक यांनी घाईघाईने टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला आणि सूचना हिच्याकडे फोन देण्यास सांगितले. फोनवरून पोलिसांनी तिला मुलाबाबत विचारलं असता, आपण मुलाला फातोर्डा (गोवा) येथे मित्राच्या घरी सोडलं असं तिने सांगितलं. पोलिसांनी तिच्याकडे पत्ता मागितला, पण तो खोटा निघाला.

टॅक्सी ड्रायव्हरने पोलिस स्टेशनच्या दिशेने वळवली कार

त्यानंतर इन्स्पेक्टर नाईक यांनी पुन्हा टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला आणि सूचनाला काही समजू नये म्हणून ते टॅक्सी ड्रायव्हरशी स्थानिक कोकणी भाषेत बोलू लागले. इ. नाईक यांनी त्या ड्रायव्हरला जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितले. ड्रायव्हरने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि टॅक्सी घेऊन सरळ पोलिस स्टेशनला गेला. तिथे गेल्यावर (हत्येचा) सर्व प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी सूचना सेठ हिला अटक केली. पोलिसांनी तिची ट्रॉली बॅग चेक केली असता, त्यामध्ये (तिच्या) मुलाचा मृतदेह आढळला.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.