Chagan Bhujbal : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले छगन भुजबळ, नातेवाईकांशीही संपर्क अन् पोलीस यंत्रणेलाही सूचना
कसारा घाटात झालेल्या अपघातामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवाशी हे जखमी झाले होते. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या. छगन भुजबळ घटनास्थळी असल्याने इतर यंत्रणाही तातडीने कामाला लागली. त्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला असला तरी इतर जखमींना वेळेत उपचार मिळाले आहेत. घटनास्थळी पोलीस अधिकारीही दाखल झाले होते.
नाशिक : वेळेचे गांभीर्य ओळखून अनेक नेते आता प्रसांगवधान दाखवत आहेत. विशेषत: प्रवासादरम्यान रोडवर (Accident) अपघात झाला तर (Politics Leader) राजकीय नेते आता त्याकडे दुर्लक्ष न करता मदतीसाठी यंत्रणा राबवत आहेत. असाच प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. माजी मंत्री (Chagan Bhujbal) छगन भुजबळ हे मुंबईहून नाशिककडे निघाले होते, दरम्यान कसारा घाटात अपघात झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी गाडी थांबवून अपघाताची पाहणी केली. एवढेच नाहीतर जे जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात हलवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. काही रुग्णांना वेळेत उपचार मिळाले तर या अपघातामध्ये वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
छगन भुजबळ यांचे प्रसंगावधान
माजी मंत्री छगन भुजबळ हे मुंबईहून नाशिककडे परततत होते. दरम्यान, कसारा घाटात अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शणास आले होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी वाहन चालकाला थांबवण्यास सांगितले आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एवढेच नाहीतर अपघातगृस्त हे कुठले आहेत त्याची माहिती घेऊन त्यांना मदत कशी करता येईल यावर लक्ष केंद्रीत केले. नेमका अपघात कसा झाला, त्यामध्ये जखमी किती अशी सर्व माहिती त्यांनी घेतली.
अपघातामध्ये चालकाचा मृत्यू
कसारा घाटात झालेल्या अपघातामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवाशी हे जखमी झाले होते. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या. छगन भुजबळ घटनास्थळी असल्याने इतर यंत्रणाही तातडीने कामाला लागली. त्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला असला तरी इतर जखमींना वेळेत उपचार मिळाले आहेत. घटनास्थळी पोलीस अधिकारीही दाखल झाले होते.
मृताच्या नातेवाईकांशी फोनवरुन संपर्क
अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कार चालकाच्या नातेवाईकांशी भुजबळ यांनी संपर्क साधला. त्यांना धीर देत रुग्णालयात येण्यास सांगितले तर अपघातामध्ये जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत भुजबळ हे थांबले होते. त्यामुळे यंत्रणा त्वरीत कामाला लागली आणि इतर प्रवाशांनाही वेळेत उपचार मिळाले.