VIDEO : ते धूम स्टाईलने दुचाकीवर आले, शिक्षिका कारमध्ये जात असतानाच मोठा गदारोळ, प्रकार सीसीटीव्हीत कैद

अहमदनगरमध्ये चैन स्नॅचिंगची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना भर दुपारी गजबजलेल्या परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

VIDEO : ते धूम स्टाईलने दुचाकीवर आले, शिक्षिका कारमध्ये जात असतानाच मोठा गदारोळ, प्रकार सीसीटीव्हीत कैद
ते धूम स्टाईलने दुचाकीवर आले, शिक्षिका कारमध्ये जात असतानाच मोठा गदारोळ, प्रकार सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 7:10 PM

अहमदनगर : राज्यातील चैन आणि मोबाईल स्नॅचिंगच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीयत. ठाण्यात काही दिवसांपूर्वी रिक्षाने प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपींमुळे महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली होती. तसेच लोकल ट्रेनमध्येही एका महिलेला चोरांमुळे जीव गमवावा लागला होता. या साऱ्या घटना ताज्या असताना अहमदनगरमध्ये चैन स्नॅचिंगची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी भर दुपारी गजबजलेल्या परिसरात चैन स्नॅचिंग केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही अहमदनगर जिल्ह्यातील राहता शहरात चितळीरोड येथील हुतात्मा चौकाजवळ घडली. दोन अज्ञात आरोपी दुचाकीने आले होते. ते प्रचंड वेगात दुचाकी चालून आले. त्यांनी महिलेला बघून दुचाकी थांबवली. महिलेच्या गळ्यातील गंठक ओढले. त्यानंतर ते वाऱ्याच्या वेगाने दुचाकीने पळून गेले. भरदुपारी अगदी वर्दळीच्या रस्त्यावर ही चोरीची घटना घडली. गंठण चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

संबंधित घटनेवनंतर परिसरात बघ्यांची गर्दी जमली. महिलाच्या डोळ्यात अश्रू आले. महिलेने वेळ न दडवता पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी त्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही चेक केले. यापैकी काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या चैन स्नॅचिंगचा संबंध थरार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून ते आरोपींचा शोध घेत आहेत.

शिक्षिका आपल्या बहिणीच्या भेटीसाठी गेली असताना वाटेत अनपेक्षित प्रकार

शिर्डी येथील शिक्षिका सायली महांकाळे या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी राहाता येथे गेल्या होत्या. भेटीनंतर कारकडे जात असताना काळ्या रंगाच्या बजाज पल्सर मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी सायली यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरुन धूम ठोकली. अगदी काही सेकंदात चोरटे पसार झाले. ही घटना सिसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सायली महांकाळे यांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी भादवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे.

डोंबिवलीत आजीबाईंची गंठक चोरांनी हिसकावली

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत अशीच काहिशी घटना समोर आली होती. डोंबिवलीत 72 वर्षीय आजीबाईच्या गळ्यातील जाडजूड चैन पाहून दोन चोरट्यांनी पाठलाग सुरु केला. सोसायटीच्या गेटवर येताच या चोरट्यांनी आजीबाईच्या गळ्यातील दागिने हिसकावले. त्यानंतर ते पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र ते दागिने बनावट होते. दागिने बनावटीचे असले तरी गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. डोंबिवलीतही भर दिवसा चैन स्नॅचिंग होत असल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

संबंधित घटनेचा थरार बघा :

हेही वाचा : तो मध्यप्रदेशातून नागपुरात यायचा, काही दिवस मुक्काम ठोकायचा, नंतर संधी साधून जे करायचा ते ऐकून पोलीसही चक्रावले

गणेशोत्सव तोंडावर, रत्नागिरीत एका घरात तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब, आरोपीचा नेमका कट काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.