माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
परमबीर सिंग हे काल मुंबईत आल्याचं कळताच न्या चांदीवाल यांनी परमबीर सिंग यांच्या वकिलांना परमबीर सिंग यांच्या विरोधात जारी केलेल्या जामीनपात्र वॉरंटची आठवण करून दिली होती. जर ते आले नाहीत तर त्यांच्या विरोधात असलेलं वॉरंट मुंबई पोलीस यांच्या वतीने बजावलं जाईल, असं म्हटलं होतं.
मुंबई : न्या चांदीवाल आयोगाने आज माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी 29 नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार परमबीर सिंग यांच्या वतीने ते सोमवारी हजर राहतील, असं आश्वासन आयोगाला दिलं आहे. तर सचिन वाझे याची आज उलट तपासणी झाली. यावेळी आपण अनिल देशमुख यांना कामानिमित्त अनेक वेळा भेटलो असल्याचं सांगितलं.
परमबीर सिंग मुंबईत आल्याची दखल चांदिवाल आयोगाने घेतली
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे मुंबई आलेत त्याची दखल आज ही चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष न्या चांदीवाल यांनी घेतली. परमबीर सिंग हे काल मुंबईत आल्याचं कळताच न्या चांदीवाल यांनी परमबीर सिंग यांच्या वकिलांना परमबीर सिंग यांच्या विरोधात जारी केलेल्या जामीनपात्र वॉरंटची आठवण करून दिली होती. जर ते आले नाहीत तर त्यांच्या विरोधात असलेलं वॉरंट मुंबई पोलीस यांच्या वतीने बजावलं जाईल, असं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर परमबीर सिंग हे आज आयोगासमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, दुपारी 1 वाजला तरी ते आले नाहीत. याची दखल न्या चांदीवाल यांनी घेतली.
न्या चांदीवाल यांनी परमबीर सिंग यांचे वकील यांना तुमचे अशील आज आयोगात येणार होते ते का आले नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर वकिलांनी ते ठाणे येथे चौकशीसाठी गेले असल्याचे सांगितलं. त्यावर जे आज येणार असल्याचे कळले होते, असे न्यायमूर्ती म्हणाले. त्यावर चौकशीसाठी बराच वेळ लागतो. परमबीर सिंग हे उद्या येतील असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. त्यावर उद्या आयोगाच कामकाज होणार नाही. त्यामुळे त्यांना सोमवारी यायला सांगा, असे आदेश न्या चांदीवाल यांनी दिलेत.
अनिल देशमुखांच्या वकिलाकडून सचिन वाझेंची उलटतपासणी
तर आज सचिन वाझे यांची उलट तपासणी अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्तीलिनो यांनी केली. यावेळी आपण राज्य पोलीस दलात भरती झालो. मी पदवीधर आहे. त्याचप्रमाणे सायबर लॉचा अभ्यास केला आहे. तुम्हाला जर मला सायबर एक्सपर्ट समजायचं असेल तर समजू शकता. माझे आणि परमबीर सिंग यांचे संबंध जसे एक वरिष्ठ अधिकारी आणि ज्युनियर अधिकारी यांचे असतात तसेच होते. त्याच प्रमाने मी तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अनेकदा कामानिमित्त भेटलो आहे.
मी त्यांना त्यांच्या सरकारी बंगला ज्ञानेश्वरी, सह्याद्री, मंत्रालय येथील कार्यालय भेटलो आहे. मी त्यांना सरकारी कामानिमित्त भेटलो आहे. मी माझ्या निलंबन काळात अनेक अधिकाऱ्यांना मदत केली आहे. मी एक प्रामाणिक अधिकारी आहे. मी कोणतंही उलटसुलट काम केलेलं नाही, अशी माहिती उत्तराच्या स्वरूपात सचिन वाझे यांनी ऍड अनिता कॅस्तीलिनो यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर दिली. (Chandiwal commission orders former police commissioner Parambir Singh to appear before it on Monday)
इतर बातम्या
मॅट्रोमोनिअल साइटवरील ओळख भोवली ; गुंगीचे औषध देत तरुणीवर केला बलात्कार
बारामतीत वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई ; दलाल महिलेला अटक, तरुणीची सुटका