घरात झोपलेली असताना 90 वर्षीय वृद्धेवर अतिप्रसंग, नराधमाला अटक

घरात एकटी असल्याचे पाहून चंद्रपूर जिल्ह्यात 90 वर्षीय वृद्धेवर युवकाने अतिप्रसंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (Chandrapur 90 years old Women Get Molested)

घरात झोपलेली असताना 90 वर्षीय वृद्धेवर अतिप्रसंग, नराधमाला अटक
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 4:26 PM

चंद्रपूर : घरात एकटी असल्याचे पाहून चंद्रपूर जिल्ह्यात 90 वर्षीय वृद्धेवर युवकाने अतिप्रसंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील महालगाव(काळू) या ठिकाणी ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. (Chandrapur 90 years old Women Get Molested)

चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महालगाव ( काळू) या ठिकाणी एक 90 वर्षीय वृद्ध महिला राहते. ही महिला झोपली असताना गावात राहणाऱ्या नरेंद्र संभाजी ननावरे (34) हा तिच्या घरात शिरला. त्यानंतर त्यांनी वीज घालवत त्या वृद्ध महिलेवर अतिप्रसंग केला.

यानंतर या वृद्धेने तिचा पती आल्यानंतर त्याला याबाबतच माहिती दिली. या माहितीनंतर या वृद्ध महिलेच्या पतीने भिसी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी नरेंद्र नन्नावरे विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७६,४५०,३२३ नुसार गुन्हा नोंदवून अटक केली.

या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी या युवकाविरोधात निषेधही व्यक्त केला जात आहे. तसेच गावातील महिला सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Chandrapur 90 years old Women Get Molested)

संबंधित बातम्या : 

घरगुती वादातून भाच्याकडून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण, मामाचा जागीच मृत्यू

दुबईचं सीमकार्ड वापरत बंगळुरुतून रॅकेट ऑपरेट, नवी मुंबई पोलिसांची आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक

धुळ्यात बनावट दारुचा मोठा कारखाना उद्ध्वस्त, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

जबरी चोरी करणाऱ्यांना सापळा लावून अटक, 51 हजारांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.