Chandrapur Crime : चोरांनी चक्क सुरक्षा रक्षकाची बंदूकच पळवली, बँक ऑफ इंडियाची शाखाही फोडली
चंद्रपुरात बँक ऑफ इंडियाची (Bank Of India) ऊर्जानगर शाखा चोरट्यांनी फोडली. मात्र सुदैवाने रोकड सुरक्षित राहिली. पण सुरक्षा रक्षकाची (Security Guard) बंदूक घेऊन चोरटे झाले पसार झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर : आपण आपली आणि आपल्या मालमत्तेची सुरक्षा (Bank Security) व्हाही म्हणून सुरक्षा रक्षक ठेवतो. बँकेच्या बाहेरची असेच सुरक्षा रक्षक तैनात असतात. बँकेच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र काही वेळेला काही चोर सुरक्षा रक्षकावरही भारी पडतता. आणि तेव्हढ्यातून चोरी करतातच. तसाच काहीसा धाडसी चोरीचा आणि थोडासा अजब प्रकार चंद्रपुरात घडलाय. कारण इथल्या चोरांनी फक्त चोरीच नाही केली. तर सुरक्षा रक्षकांची बंदूक घेऊन चोरटे पसार झाले आहे. चंद्रपुरात बँक ऑफ इंडियाची (Bank Of India) ऊर्जानगर शाखा चोरट्यांनी फोडली. मात्र सुदैवाने रोकड सुरक्षित राहिली. पण सुरक्षा रक्षकाची (Security Guard) बंदूक घेऊन चोरटे झाले पसार झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे., चंद्रपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गापूर पोलिस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. आता चोरांचा शोध तातडीने पोलिसांनी सुरू केला आहे.
रोकड कशी वाचली?
चंद्रपूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गापूर पोलिस ठाणे हद्दीतील ऊर्जानगर येथील बँक ऑफ इंडियाची शाखा अज्ञात चोरट्यांनी फोडली. ही शाखा शनिवारी किंवा रविवारी सुट्टीच्या दिवसात फोडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज बँकेचे शाखा व्यवस्थापक योगेश चौधरी व दुर्गापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. बँकेच्या मागील दरवाजाचे चोरट्यांनी कुलूप तोडून शाखेच्या आत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती कुठल्याही प्रकारची रोकड किंवा दागिने लागले नाही. केवळ सुरक्षा रक्षकाची बंदूक त्यांच्या हाती लागली. ती बंदूक घेऊन चोरटे पसार झाले.
पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू
आज सोमवारी बँकेच्या वेळेनुसार बँक कर्मचारी व अधिकारी बँक शाखेत पोहचले.तेव्हा बँकेच्या मागील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.लागलीच याबाबतची माहिती दुर्गापूर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार स्वप्निल धुळे यांच्यासह त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून दुर्गापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध 454 457 380 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बँक अज्ञात चोरट्यांनी फोडली असून, बँकेतील सुरक्षारक्षकाच्या बंदूकी शिवाय अन्य कुठलेही साहित्य किंवा रोकड चोरीला गेली नसल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक योगेश चौधरी यांनी दुर्गापूर पोलिसात नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहेत.
Sadabhau Khot : “अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशातला नाच्या”, सदाभाऊ खोतांची मिटकरींवर जहरी टीका